पोलिस इमारतीत केले अलिशान हॉटेल

great
एका भारतीय अब्जाधीशाने लंडन मध्ये १८९० साली बांधल्या गेलेल्या मेट्रोपोलीस इमारतीचे अलिशान हॉटेल मध्ये रुपांतर केले असून एका रात्रीसाठी येथे १ हजार पौंड म्हणजे सुमारे ७२ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

scotlandyard
या पोलीस इमारतीच्या लीज साठी ११० दशलक्ष पौंड किंमत मोजली गेली आहे. २०१५ साली ही इमारत भारतीय अब्जाधीशाच्या हातात आली. त्यांनी या इमारतीचे अलिशान हॉटेल मध्ये रुपांतर केल्यावर रातोरात ती प्रसिद्धीच्या झोतात आली. डिसेम्बर २०१३ मध्ये ब्रिटीश रक्षा मंत्रालयाने ती गलीयार्ड होम नावाच्या कंपनीला लीजवर दिली होती. त्यामागे फंड गोळा करणे हा उद्देश होता. भारतीय कैदर यांनी हि इमारत २०१५ ला संबंधित कंपनीकडून लीज वर घेतली. त्यात १५० खोल्या असून त्यात पूर्वी गुन्हेगारांना कैदी म्हणून ठेवले जात असे. लंडनच्या ट्राफलगार स्क्वायर मध्ये ही इमारत आहे.

yard
आता ती अलिशान हॉटेल मध्ये रुपांतरीत झाली असून हॉटेल ग्राहकांना येथे लंडनच्या प्रसिद्ध गुन्हेगाराच्या आठवणी जगविण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी कैद्यांनी शिवलेले लष्करी गणवेश, त्यांच्या कलाकृती आणि एक झुंबर येथे आहे. गुन्हेगारांच्या कोठ्या हॉटेल रूम बनल्या आहेत. येथे गुप्त व्हिस्की बार, चहा पार्लर, बॉलरूम व रेस्टॉरंट आहे. ग्रेट स्कॉटलंड यार्ड हॉटेल असे याचे नाव आहे आणि येथे दिली जाणारी असामान्य सेवा, लग्झरी आणि गुणवत्ता यामुळे ते ब्रांड हॉटेल बनेल असा दावा मालक करत आहेत.

Leave a Comment