ब्रुटेला ८०० आरआर बाईकची फक्त ५ युनिट भारतात विक्रीला

mvaugusta
इटलीची मोटारसायकल उत्पादक कंपनी एमव्ही ऑगस्ताने त्यांच्या दमदार ब्रुटेला ८०० आरआरची स्पेशल एडिशन सादर केली असून त्या बाईकची फक्त २०० युनिट बनविली जाणार आहेत. त्यातील फक्त ५ भारतात विक्रीसाठी येणार असल्याचे समजते. या बाईकची एक्स शोरूम किंमत १८.७३ लाख असून ऑन रोड ती १९ लाखापेक्षा अधिक किमतीला मिळेल. ही स्पेशल एडिशन अमेरिका नावाने बाजारात आणली जात आहे.

नवीन स्टँडर्ड व्हर्जनपेक्षा ही एडिशन ३० हजार रुपयांनी स्वस्त आहे. अमेरिकी ध्वजावरून तिच्या रंगाची प्रेरणा घेतली गेली आहे. रेड, व्हाईट आणि ब्ल्यू रंगाचे कॉम्बिनेशन असून अॅलॉय व्हीलवर ब्ल्यू आणि रेड पेंट दिला गेला आहे. या बाईकला ७९८ सीसीचे तीन सिलिंडर लिक्विड कुल इंजिन, ६ स्पीड ट्रान्समिशन सह दिले गेले आहे तसेच लेटेस्ट इलेक्ट्रोनिक फीचर्स दिली गेली आहेत.