जयललिता बायोपिकसाठी कंगना घेणार २४ कोटी रुपये

kangana
बॉलीवूड क्वीन कंगना रानौतने बॉलीवूड मध्ये सर्वाधिक मानधन मिळविण्याचा नवा विक्रम नोंदविला आहे. अभिनेत्री आणि तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर बनत असलेल्या बायोपिक मध्ये जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगनाला २४ कोटी रुपये दिले जात असून तसा करार नुकताच झाला असल्याचे समजते. आत्तापर्यंत बॉलीवूड मध्ये सर्वाधिक मानधन घेण्याचा विक्रम दीपिका पादुकोनेच्या नावावर होता. तिने पद्मावत साठी ११ कोटी रुपये मानधन घेतले होते.

जयललिता यांच्या जीवनावरचा हा चित्रपट तमिळ आणि हिंदी अश्या दोन भाषात बनविला जात आहे. तमिळ चित्रपट थलावइ नावाने तर हिंदी चित्रपट जया नावाने बनत आहे. कंगना या चित्रपटाविषयी म्हणाली, जयललिता या शतकातील एक यशस्वी महिला आहेत. त्या सुपरस्टार होत्या आणि धोरणी राजकारणी सुद्धा. त्यांचे जीवन हा चित्रपटासाठी चांगला विषय आहे आणि ही भूमिका मला साकारायला मिळते आहे हा माझा सन्मान आहे. जयललिता यांनी तमिळ, तेलगु आणि कन्नड चित्रपटातून अनेक अजरामर भूमीका साकारल्या आहेतच शिवाय त्या १९९१ ते २०१६ पर्यंत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या.

या चित्रपटाचे दिग्दर्शन दक्षिणेतील प्रसिध्द दिग्दर्शक विजय हे करणार आहेत. त्यांनी यापूर्वी मद्रसापटीनम व दैवा तीरुमागल या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Leave a Comment