मुलाखत देतानाची देहबोली

job
एखाद्या नोकरीसाठी इंटरव्ह्यूचा कॉल आला की, विद्यार्थ्याची गडबड सुरू होते. वाचन सुरू होते, कपड्याची तयारी सुरू होते. इंटरव्ह्यूमध्ये या सार्‍या गोष्टी पाहिल्या जातच असतात. परंतु एक गोष्ट कधीही विसरता कामा नये की, इंटरव्ह्यूमध्ये उमेदवाराचा आत्मविश्‍वास ङ्गार कसोशीने तपासला जात असतो आणि उमेदवारांनी आपल्या देहबोलीतून आपल्यातला आत्मविश्‍वासाचा अभाव प्रगट होऊ नये याबाबत काळजी घेण्याची गरज असते. मुलाखतीला जाताना व्यवस्थित कपडे घातलेले असले पाहिजेतच, परंतु काही मुले इंटरव्ह्यूच्या हॉलमध्ये गेल्यानंतर कपडे ठाकठीक करायला लागतात. एकदा तुम्ही इंटरव्ह्यू घेणार्‍या पॅनेलच्या समोर उभे राहिलात की, नंतर कपडे ठाकठीक करू नका. परंतु पॅनलच्या समोर उभे राहून इनशर्ट ठीक करणारी, बेल्ट व्यवस्थित करणारी काही मुले असतात ही गोष्ट ङ्गार खटकणारी असते. आपल्याला आपले कपडे ठाकठीक करायचे असतील तर आत जाण्याच्या आधी केले पाहिजेत.

इंटरव्ह्यू देताना आपल्याला बसण्याचा आदेश झाल्याशिवाय खुर्चीवर बसू नये आणि इंटरव्ह्यू घेणारे लोक आत आलेल्या उमेदवाराने गुड मॉनिंग किंवा नमस्कार म्हणेपर्यंत आणि त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देईपर्यंत बसा म्हणत नाहीत. उमेदवाराने बसा म्हणण्याची वाट पहावी आणि नंतरच त्यांना धन्यवाद देऊन बसावे. बसण्याची पद्धत कशी असावी? याचेही शास्त्र आहे. खुर्चीच्या बॅकला ङ्गार रेलून बसू नका. तसे बसल्याने पाय नको तसे पुढे येतात आणि त्यातून आपला उद्धटपणा दिसतो. याचा अर्थ खुर्चीवर ङ्गार ताठ बसा असाही होत नाही. नाही तर काही मुले पाठीच्या कण्यातून एखादा लोखंडी रॉड घातला असल्यागत एकदम १८० अंंशात ताठ बसतात. त्याचीही गरज नाही. किंचित आरामात पण ताठ बसावे. बसल्यानंतर आपल्या पायांची अवस्था कशी असावी? एक पाय मागे, एक पाय पुढे असू नये. दोन्ही पाय जमिनीला टेकलेले असावेत. काही लोकांना पाय मांडीवर घेण्याची सवय असते. त्यातून वरचढपणा दिसत असतो. तसे बसू नये.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली नजर. नजरेमध्ये बरेच काही सामावलेले असते. इंटरव्ह्यूच्या वेळी आपली नजर कशी आहे हे पाहिले जात असते. काही मुलांना इंटरव्ह्यू घेणार्‍या पॅनल सदस्यांच्या डोळ्याला डोळा न भिडविण्याची सवय असते. ते छताकडे पहात असतात किंवा सदस्यांची नजर चुकवत असतात. नजर चुकवण्यातून आत्मविश्‍वा साचा अभाव दिसत असतो. त्याशिवाय काही मुलांना खाली बघण्याची सवय असते. तीही वाईट. प्रश्‍न विचारणार्‍याच्या डोळ्याला डोळा भिडवा. त्यातून आत्मविश्‍वास दिसतो. परंतु ङ्गार टक लावून बघू नका. एकदा नजरेला नजर भिडली की, साधारणत: दहा सेकंदपर्यंत त्यांच्याकडे बघा आणि तेवढ्या वेळेनंतर दुसर्‍या सदस्यांकडे बघा. त्या सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडेच असतात, तेव्हा अधूनमधून एकेकाकडे बघा. त्यामध्ये उद्धटपणा असू नये. मात्र उत्सुकता असावी, नम्रता असावी. एखाद्या सदस्याकडे बघत असताना दुसरा सदस्य प्रश्‍न विचारतो. ताबडतोब प्रश्‍न विचारणार्‍यांकडे नजर टाका. त्यातून तुमची नजरेला नजर देण्याची पद्धत ही नैसर्गिक आहे हे त्यांच्या लक्षात येईल.

आपण आपली कागदपत्रे घेऊन गेलेलो असतो आणि ती ङ्गाईल समोर ठेवण्याचा आदेश आपल्याला दिला जातो. आपण आपली कागदपत्रे एखाद्या ब्रिङ्गकेसमध्ये नेली असतील तर ती ब्रिङ्गकेस टेबलवर ठेवू नका. ती आपल्या पायाशी ठेवा आणि त्यातली कागदपत्रे काढून ती पॅनलसमोर ठेवा. जाताना कागदपत्रे शांतपणे गोळा करा. ती आपल्या ब्रिङ्गकेस-मध्ये ठेवा आणि नंतरच बाहेर पडा. ब्रिङ्गकेस वेगळ्या हातात आणि कागदपत्रे वेगळ्या हातात घेऊन बाहेर जाऊन ती ब्रिङ्गकेसमध्ये ठेवू असा विचार करू नका. कारण त्यामुळे आपले दोन्ही हात गुंतलेले राहतात आणि परत जातानाचे हस्तांदोलन किंवा नमस्कार करताना आपली अवस्था वाईट होते. अशा छोट्या छोट्या गोष्टींना इंटरव्ह्यूमध्ये ङ्गार महत्व दिले जाते.

Leave a Comment