कोणतेही सरकार, धर्म नसलेले शहर ओरोविल

auroville1
दक्षिण भारताच्या तमीळनाडू राज्याचा तसेच पाँडीचेरीचा भाग असलेले ओरोविल शहर अनेक कारणांनी अद्धभूत आहे. या शहरात कोणताही धर्म नाही, तसेच या शहरासाठी कोणतेही सरकारही नाही. मानव हाच धर्म व मानवी एकात्मता याच उद्देशाने हे शहर वसविले गेले आहे. भारत सरकारचे या शहराला समर्थन आहे व युनेस्कोने या शहराला आंतरराष्ट्रीय शहर म्हणून मान्यता दिली आहे. पहाटेचे शहर किवा सिटी ऑफ डॉन या नावानेही ते ओळखले जाते.

या शहरात कोणत्याही देशाचा, धर्माचा नागरिक वास्तव्य करू शकतो. मात्र येथे राहताना त्याला कोणतेही पद मिळत नाही तर सेवक म्हणून राहावे लागते. येथे जातपात, उच्चनीच अस भेदभाव करता येत नाही. या शहराचे भूमीपूजन अरविंद आश्रमाच्या माताजींच्या आशीर्वादाने २८ फेब्रुवारी १९६८ रोजी १२४ देश व भारतातील २३ राज्यातून एकत्र आलेल्या ५ हजार लोकांनी एका वडाच्या झाडाखाली जमून केले. १२४ देशातून तसेच भारताच्या २३ राज्यातून आणण्यात आलेली माती येथे एकत्र केली गेली. अशा शहराची कल्पना माँना १९३० सालीच सुचली होती असेही सांगितले जाते.

auroville
या शहराची रचना वैशिष्ठपूर्ण आहे. शहरात एकच मंदिर आहे मात्र ते कोणत्याही देवाचे नाही. ते मातृमंदिर म्हणून ओळखले जाते व येथे लोक योगाभ्यास, ध्यानधारणा करतात. शहरात इंडस्ट्री, निवासी, शांतता, आंतरराष्ट्रीीय असे विविध विभाग आहेत. लघु व मध्यम क्षमतेचे उद्योग आहेत तसेच प्रशिक्षण केंद्रे, कला, क्राफ्ट आणि प्रशासनही आहे. शहराभोवती मोठा ग्रीन बेल्ट आहे. बगीचे खूपच आहेत.

चेन्नईपासून १५०किमी वर तर पाँडिचेरीपासून १४ किमीवर अंतरावर हे शहर आहे. जगातला हा पहिला व एकमेव आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे.

Leave a Comment