कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षक खेचून आणण्यासाठी आयसीसीने केला हा नवा बदल

ICC
दुबई – कसोटी क्रिकेट टी-२० क्रिकेटची लोकप्रियता पाहून धोक्यात आल्याची चर्चा होत आहे. आयसीसीने कसोटी क्रिकेट वाचविण्यासाठी त्यांच्या जुन्या नियमात बदल केला आहे. आता कसोटी क्रिकेटमध्येही एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटप्रमाणे खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि क्रमांक लिहिण्याची परवानगी दिली आहे.

अॅशेस मालिकेत खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि क्रमांक लिहिण्याची मागणी इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्डाने केली होती. आयसीसीने त्याला मंजुरी दिली आहे. १ ऑगस्ट २०१९ पासून हा नवा नियम लागू होईल.

आयसीसीने नुकतेच कसोटी चॅम्पियनशिपचेही आयोजन केले आहे. १५ जुलैपासून ज्याची सुरुवात होईल आणि या कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना २०२१ मध्ये होईल. कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षक खेचून आणण्यासाठी आयसीसी हे नवे बदल करत आहे.

Leave a Comment