या सत्रात कामगिरीत सातत्य राखण्यास आतूर किंग्स इलेव्हन पंजाब

KXIP
२००८ मधील सेमिफायनलिस्ट तर २०१४ मध्ये उपविजेतेपद सोडल्यास किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाची कामगिरी निराशजनकच राहिली. युवराज सिंग, कुमार संगकारा, शॉन मार्श, विरेंद्र सेहवाग, ग्लेन मॅक्सवेल, ब्रेट ली, इरफान पठान, सायमन कॅटिच, जॉर्ज बेली, मिशेल जॉन्सन, हाशिम अमला यांसारख्या खेळाडुंनी संघाचे प्रतिनिधित्व केले पण ते संघाला विजेतेपद मिळवुन देऊ शकले नाहीत.
KXIP1
२०१८ मध्ये पंजाबने रविचंद्रन अश्विनची कर्णधारपदी नेमणुक केली होती. अश्विन सोबतच ख्रिस गेल, मयंक अगरवाल. के एल राहुलचा संघात समावेश करत एका तगड्या संघाची बांधणी पंजाबने केली होती. के एल राहुल, ख्रिस गेल, अॅण्ड्रु टाय, मुजिब उर रहेमानच्या कामगिरीच्या बळावर पंजाबने पहिल्या ७ सामन्यांपैकी ५ सामन्यांत विजय मिळवत पंजाबने शानदार सुरुवात केली होती आणि संघ पहिल्या चार संघात स्थान मिळवेल असेच दिसत होते पण उर्वरित ७ सामन्यांत त्यांना फक्त १ विजय मिळवता आला आणि पंजाबच्या संघाला ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
KXIP2
२०१८च्या सत्रात चांगल्या सुरुवातीनंतरही ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने या सत्रात कामगिरीत सातत्य राखण्यास पंजाबचा संघ आतुर असेल. संघाच्या फलंदाजीची जिम्मेदारी के एल राहुल, ख्रिस गेल, मयंक अगरवाल, मंदिप सिंग, सरफराज खानवर असेल तर गोलंदाजीची कमान रविचंद्रन अश्विन, अॅण्ड्रु टाय, मोहम्मद शमी, अंकित राजपुत, मुजिब उर रहेमानवर असेल. ट्रांसफर विंडो द्वारे स्टॉयनिसच्या जागी पंजाबने मंदिप सिंगला संघात सामावुन घेतले त्यामुळे सॅम करन व मोईझेस हेन्रिक्सपैकी कोणाला संघात संधी मिळते हे पाहावे लागेल. विश्वचषकात संधी मिळवण्यास उत्सुक असलेल्या के एल राहुलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

संभावित संघ – रविचंद्रन अश्विन (कर्णधार), के एल राहुल, ख्रिस गेल, मयंक अगरवाल, मनदिप सिंग, करुण नायर, सरफराज खान, मुर्गन अश्विन, सॅम करन, मोईझेस हेन्रिक्स, अॅण्ड्रु टाय, मोहम्मद शमी, अंकित राजपुत, मुजिब उर रहेमान, डेविड मिलर
प्रशिक्षक – माईक हस्सी

शंतनु कुलकर्णी, क्रिकेट लेखक
Page – fb/Cricket Articles instagram/cricketarticles twitter/cricketarticles
www.thedailykatta.com

Leave a Comment