जी जोडपी एकमेकांशी नेहमी भांडतात, ती तितकीच एकमेकांच्या जवळही असतात

couple
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी बहुतांश जोडपी ही कामधंदा करत असतात. पण त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर खुप परिणाम होतो. परिणामी या जोडप्यांमध्ये क्षुल्लक कारणांवरुन देखील खटके उडतात. याचे उदाहरण आपण आपल्या आजुबाजुला पाहिलेच असेल. पण ही जोडपी जरी एकमेकांशी नेहमी भांडत असली तरी ती तितकीच एकमेकांच्या जवळही असतात. म्हणून आम्ही आज तुम्हाला भांडण आणि प्रेम यांचे काय नाते असते याबाबत सांगणार आहोत.
couple1
जी जोडपी समोपचाराने राहतात म्हणजे कधीच भांडत नाहीत ती एकमेकांबरोबर कम्फर्टेबल नसतात. एकमेकांविषयी वाटणारी भीती यात असते. पण एकमेकांबरोबर नेहमीच जे वाद घालत असतात, त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते, असे सायकॉलॉजिस्टचे म्हणणे आहे.
couple2
सायकॉलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार एकमेकांवर खुप प्रेम असणारेच एकमेकांशी वाद घालताना अनेकदा नकारात्मक बोलतात. पण त्यामुळेच त्यांच्या नात्याला उत्तेजना मिळते. याबाबत माहिती देताना डॉ. जॉन गॉटमन सांगतात, की भांडणानंतर जी जोडपी कुणाचे काय चुकले, त्यावर काय मार्ग काढायचा याची चर्चा करतात, ती एकमेकांच्या प्रेमात जास्त असतात. प्रत्येक माणसाच्या दोन बाजू असतात. ज्या जोडप्यांमध्ये वाद होतात, ते आपली दुसरी बाजूही आपल्या जोडीदारासमोर उघड करतात. त्यात जास्त मोकळेपणा आणि आपलेपणा असतो. डॉक्टरांच्या मते अनेकदा इतर ताणतणाव आपल्या जवळच्या व्यक्तीसमोरच बाहेर येतात. इतर फ्रस्ट्रेशन्स अगदी जवळच्या व्यक्तीसमोर उघड होतात. म्हणून जोडप्यांमधील वाद हे हेल्थी रिलेशनशिपचे लक्षण आहे.

Leave a Comment