केन विल्यमसनच्या नेतृत्वात खेळणार सनरायझर्स हैद्राबाद

SH
२०१२ सत्रानंतर काही कारणास्तव डेक्कन चार्जसचा संघ आयपीएलमधुन बाद झाला आणि सन टीव्ही नेवर्कने संघ खरेदी केला. आपल्या पहिल्याच सत्रात संघाने पहिल्या ४ संघात स्थान मिळवले. त्यानंतर २०१६ मध्ये डेविड वॉर्नच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सनरायझर्स हैद्राबादने रॉयल चॅलेंजर्सचा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. नंतर २०१८ मध्ये केन विल्यमसनच्या नेतृत्वात खेळत संघाने अंतिम फेरी गाठली पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
SH1
चेंडू कुरतडल्या प्रकरणी डेविड वॉर्नरवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती त्यामुळे वॉर्नच्या अनुपस्थित केन विल्यमसन २०१८ च्या सत्रात संघाचे नेतृत्व करणार होता. २०१८ च्या सत्रात पहिल्या ७ सामन्यांत ५ विजय मिळवत संघाने सत्राची शानदार सुरुवात केली होती आणि शेवटी १४ सामन्यांत ९ विजयांसह पहिले स्थान पटकावले होते. क्वालिफायर-१ मध्ये चेन्नई सुपरकिंगकडुन पराभव झाल्यानंतर संघाने क्वालिफायर-२ कोलकत्ताचा पराभव करत दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठला पण अंतिम सामन्यांत चेन्नई सुपरकिंगकडुन पराभव स्विकारावा लागला. या कामगिरीत महत्त्वाची भुमिका मांडली ती सत्रात सर्वाधिक धावा काढणारा कर्णधार केन विल्यमसन, शिखर धवन, राशिद खान आणि सिद्धार्थ कौलने.
SH2
२०१८ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास संघ उत्सुक असेल हे मात्र नक्की. पण पुनरावत्ती करण्याची जिम्मेदारी एक वर्षांनतर संघात आलेला डेविड वॉर्नर, केन विल्यमसन, जॉनी बेअरस्टो, मनिष पांडे व विजय शंकरवर संघाच्या फलंदाजीची तर शदाब नदिम, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, सिद्धार्थ कौल, संदिप शर्मावर गोलंदाजीची जिम्मेदारी असेल. जॉनी बेअरस्टो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत आहे त्यामुळे तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. संघात चार विदेशी खेळाडुंना संधी दिली जाऊ शकते त्यामुळे शाकिब अल हसनला संघाबाहेरच राहावे लागेल

संभावित संघ – केन विल्यमसन (कर्णधार), डेविड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनिष पांडे, युसुफ पठाण, विजय शंकर, शदाब नदिम, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, सिद्धार्थ कौल, संदिप शर्मा

प्रशिक्षक – टॉम मुडी

शंतनु कुलकर्णी, क्रिकेट लेखक
Page – fb/Cricket Articles instagram/cricketarticles twitter/cricketarticles
www.thedailykatta.com

Leave a Comment