शानदार कामगिरीची अपेक्षा असलेला राजस्थान रॉयल्स

RR
आयपीएलच्या पहिल्या सत्राचा विजेता राजस्थानच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता. सुरुवातीची काही सत्र शेन वॉर्नच्या नेतृत्वात खेळल्यानंतर राहुल द्रविड, शेन वॉटसनच्या नेतृत्वात राजस्थानची कामगिरी हवी तशी झाली नाही. २००८ नंतर राजस्थानचा संघ २०१३ व २०१५ मध्ये पहिल्या ४ संघात स्थान मिळवले होते पण त्यांना अंतिम सामन्यांत धडक मारण्यात अपयश आले. २०१५ मध्ये झालेल्या फिक्सिंग प्रकरणात चेन्नई सुपरसिंग सोबत राजस्थान रॉयल्सच्या संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
RR1
दोन वर्षांच्या बंदीनंतर राजस्थान रॉयल्सचे २०१८ मध्ये पुनरागमन केले होते पण सत्र सुरु होण्याआधीच स्टिव्हन स्मिथच्या रुपाने संघाला मोठा धक्का बसला. चेंडू कुरतडल्या प्रकरणी स्टिव्हन स्मिथवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. स्मिथच्या अनुपस्थित अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात संघाने शानदार कामगिरी केली. जॉस बटलर, बेन स्टोक्स, संजु सॅमसन, श्रेयस गोपाल, जोफ्रा आर्चरच्या शानदार कामगिरीच्या बळावर संघाने १४ सामन्यांत ७ विजय मिळवत पहिल्या चार संघात स्थान मिळवले पण एलिमिनेटर मध्ये कोलकत्ताविरुद्ध २५ धावांनी पराभव स्विकारावा लागला.
RR2
२०१८ प्रमाणेच या सत्रातही बटलरकडुन शानदार कामगिरीची अपेक्षा असेल. विश्वचषकाच्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आतुर असलेल्या अजिंक्य रहाणेही शानदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल. स्टिव्हन स्मिथच्या संघात परतण्याने संघाची फलंजाजी आणखी मजबुत झाली आहे. संघाच्या गोलंदाजीची धुरा जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपालवर असेल. विश्वचषकामुळे स्मिथ, स्टोक्स, बटलर सत्रात किती सामने खेळतात यावर संघाची आगेकुच अवलंबुन असेल हे मात्र नक्की.

संभावित संघ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), स्टिव्हन स्मिथ, जोस बटलर, बेन स्टोक्स, संजु सॅमसन, स्टुअर्ट बिन्नी, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, कृष्णप्पा गौतम, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी

प्रशिक्षक – पॅडी उप्टन

शंतनु कुलकर्णी, क्रिकेट लेखक
Page – fb/Cricket Articles instagram/cricketarticles twitter/cricketarticles
www.thedailykatta.com

Leave a Comment