… नाहीतर आज मी पॉर्नस्टार झाले असते – कंगना राणावत

kangana-ranavat1
हिमाचल प्रदेशमधील मनालीजवळील एका छोट्याशा गावात आजच्या दिवशी बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच ग्लॅमर दुनियेशी कंगनाचा काडीमात्र संबंध नव्हता. कंगनाचे वडील अमरदीप पेश्याने कंत्राटदार होते आणि तिची आई आशा शिक्षिका आहे. डेहरादूनमध्ये कंगनाचे बालपण गेले. तेथेच डीएव्ही हायस्कूलमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले.

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक कंगना आज मानली जाते. पण हे यश कंगनाला सहजासहजी मिळालेले नाही. तिच्या कुटुंबियांची कंगनाने डॉक्टर बनावे अशी इच्छा होती. पण त्यात तिला रस नव्हता आणि ती त्यामुळे घर सोडून दिल्लीला राहायला आली आणि मॉडलिंगच्या करियरला तिने सुरुवात केली. त्यानंतर अभिनयाचे धडे दिग्दर्शक अरविंद गौर यांच्याकडे गिरवले. तिला दिल्लीत असताना रंगमंचावर अभिनय करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये काम शोधण्यासाठी मुंबईत आली. कंगनाचा अभिनयक्षेत्रात करियर करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबियांना मान्य नव्हता. कंगना त्यामुळे स्वबळावर मुंबईत काम शोधत होती.

कंगनाने Vh1 Inside Access या टीव्ही शोला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मी हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा भाग बनण्याअगोदर एक अ‍ॅडल्ट चित्रपट साइन केला होता. या चित्रपटासाठी मला फोटोशूट करायचे होते. पण मी जेव्हा त्याठिकाणी पोहोचली तेव्हा मला सगळ्या गोष्टी खूपच विचित्र वाटल्या. मला या गोष्टी चुकीच्या असल्याचे जाणवत होते. पण माझ्याकडे काम नसल्याने हे करू असे मी ठरवले होते. जर मला अनुराग बासूने ‘गँगस्टर’या चित्रपटात भूमिका दिली नसती तर आज मी कदाचित पॉर्न इंडस्ट्रीत असती. मला या चित्रपटासाठी बरेच ऑडिशन्स द्यावे लागले. तसेच कित्येक महिने मला प्रतीक्षा करावी लागली. परंतु हा चित्रपट मिळाल्यानंतर जणू काही माझ्या करिअरची दिशाच बदलली. मी त्यानंतर या इंडस्ट्रीपासून दूर राहणे पसंत केले. मी माझ्या अभिनयावर या चित्रपटानंतर खूप मेहनत घेतली. एकापेक्षा एक चॅलेंजिंग अशा भूमिका त्यानंतर मी साकारल्या.

Leave a Comment