यावेळी ‘हे’ स्टार कलाकार लढवणार लोकसभा निवडणूक

election
तृणमृल काँग्रेसकडून लोकसभा निवडणुका लढवणाऱ्यांच्या ४२ जागांसाठी नावांची यादी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली. यावेळच्या यादीचे वैशिष्टय म्हणजे त्यांनी या यादीत ४०.५ टक्के महिलांना महिलांना उमेदवारी दिली आहे. ममता यांनी त्यांच्या पक्षातून यावेळी पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती या निवडणूका लढवणार असल्याचे घोषित केले आहे.
election1
बंगाली चित्रपटांमध्ये मिमी २००८ पासून सक्रीय आहे. जलपैगुडी शहरात मिमीचा जन्म झाला. तर बालपणाचा काही काळ तिने अरुणाचल प्रदेश येथे घालवला. कोलकात्यातील आशुतोष कॉलेजमधून तिने इंग्रजी लिट्रेचरमध्ये पदवी घेतली. दरम्यानच्या काळात मिमी मॉडेलिंगही करत होती. तिने मॉडेलिंग क्षेत्रात असतानाच २००८ मध्ये आपले लक्ष बंगाली सिनेसृष्टीकडे वळवले. ती गानर ओपेरे या मालिकेतून सर्वांच्या लक्षात आली.
जादवपुर मतदारसंघातून ३० वर्षीय मिमी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. ‘बपी बरी जा’ या चित्रपटात मिमीने पहिल्यांदा काम केले. मिमीने आतापर्यंत २० हून अधिक चित्रपटांत काम केले. तिचा आगामी ‘मोन जाने ना’ हा चित्रपट आहे. चित्रपट कलाकारांना ममता बॅनर्जींनी लोकसभेच्या आखाड्यात उतरवले आहे. मुनमुन सेन, शताब्दी रॉय, दीपक अधिकारी यांसारख्या कलाकारांचा यात समावेश आहे. मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ या मॉडेलिंग क्षेत्रातून अभिनयाकडे वळलेल्या अभिनेत्रीही राजकारणात उतरल्या आहेत.
election2
बंगळूरु मध्य लोकसभा मतदारसंघातून दक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपा उमेदवार पीसी मोहन माने याठिकाणाहून निवडणूक लढवणार आहेत. तसेच प्रकाश राज यांना आम आदमी पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. चित्रपट कलाकारांसोबत क्रिकेटपटूही लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला. तो दिल्लीतून निवडणूक लढवू शकतो.
election3
तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये अनेक कलाकारांना संधी दिली आहे. सध्याच्या खासदार आणि अभिनेत्री मुनमुन सेन आसनसोल येथून निवडणूक लढणार आहेत. बंगाली अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल नुसरत जहां हीसुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. तिला बशीरहाट येथील उमेदवारी ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. नुसरत जहां प्रमाणेच मिमी चक्रवर्तीनेदेखील ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता देव हेदेखील राजकारणात उतरणार आहेत. 2014 मध्ये त्यांनी विजय मिळवला होता.
election4
डान्सर सपना चौधरी उत्तर प्रदेशातून मथुरा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून लढण्याची शक्यता आहे. सपना चौधरीला जर तिकीट मिळाले तर तिच्यात आणि हेमा मालिनी यांच्यातील लढत पहायला मिळेल. भाभीजी घर पर है या मालिकेतून स्टार झाल्यानंतर बिग बॉसची विजेता ठरलेल्या अभिनेत्री शिल्पा शिंदेने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शिल्पाच्या पाठोपाठ अभिनेत्री अर्शी खान हिनेदेखील कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Leave a Comment