नरेन-चावला व कुलदिप या त्रिकुटावर निर्भर कोलकाता नाईट रायडर्स

KKR
पहिल्या तीन सत्रात निराशजनक कामगिरी केल्यानंतर कोलकत्ता नाईट रायडर्सने गौतम गंभीरची कर्णधारपदी नेमणुक केली होती आणि आपल्या पहिल्याच सत्रात २०११ त्याने संघाला पहिल्या ४ संघात स्थान मिळवुन दिले. गौतम गंभीरच्या कर्णधारपदाच्या ७ सत्रात कोलकत्ताने दोन वेळेस (२०१२ व २०१४) मध्ये विजेतेपद तर २०११, २०१६ व २०१७ मध्ये पहिल्या चार संघात स्थान मिळवले. कोलकत्त्यासाठी शानदार कामगिरी केलेल्या गौतम गंभीरला २०१८ मध्ये दिल्लीने आपल्या संघात सामावुन घेतले होते त्यामुळे त्याच्या जागी कोलकत्त्याने दिनेश कार्तिकची कर्णधारपदी नेमणुक केली.
KKR1
दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकत्ता संघाने शानदार कामगिरी केली. कार्तिकसोबतच मुंबईसाठी शानदार कामगिरी केलेल्या नितीश राणाला कोलकत्त्याने आपल्या संघात सामावुन घेतले होते. कोलकत्त्याकडुन कर्णधार दिनेश कार्तिक, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, सुनिल नरेन, आंद्रे रसेल, नितीश राणाने फलंदाजीत तर सुनिल नरेन, कुलदिप यादव व पियुष चावलाने गोलंदाजीत शानदार कामगिरी केली. सुनिल नरेनची अष्टपेलु कामगिरी कोलकत्यासाठी मोलाची ठरली. क्वालिफायर २ मध्ये कोलकत्याला हैद्राबादकडुन पराभव स्विकारावा लागला. २०१८ मध्ये कोलकत्त्याने १४ सामन्यांत ८ विजय मिळवत तीसरे स्थान पटकावले.
KKR2
२०१८ च्या सत्राप्रमाणेच या सत्रातही संघाच्या फलंदाजीची जिम्मेदारी कर्णधार कार्तिक, ख्रिस लीन. नितीश राणा, उथप्पा, रसेल, नरेन व शुभमन गिलवर तर गोलंदाजीची दिम्मेदारी नरेन, कुलदिप यादव, चावला, लॉकी फर्गुसनवर असेल. कमलेश नागरकुटी व शिवम मावीने दुखापतीमुळे माघार घेतल्याने संघाने संदिप वॉरियर व के सी करीयप्पाला संघात सामावुन घेतले. पण संघाला अनुभवी भारतीय जलदगती गोलंदाजाती कमतरता जाणवेल त्यामुळे नरेन-चावला व कुलदिप या त्रिकुटावर मोठी जिम्मेदारी असेल हे मात्र नक्की.

संघ – दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, ख्रिस लिन, नितीश राणा, शुभमन गिल, आंद्रे रसेल, सुनिल नरेन, कुलदिप यादव, पियुष चावला, लॉकी फर्गुसन, प्रसिध कृष्णा
प्रशिक्षक – जॅक कॅलिस

शंतनु कुलकर्णी, क्रिकेट लेखक
Page – fb/Cricket Articles instagram/cricketarticles twitter/cricketarticles
www.thedailykatta.com

Leave a Comment