नव्या नावसह मैदानात उतरणारा दिल्ली कॅपिटल्स

DC
२००८, २००९ व २०१२ मध्ये पहिल्या चार संघातील स्थान वगळता दिल्लीच्या कामगिरीचा आलेख घसरताच राहिला. पहिल्या काही सत्रात विरेंद्र सेहवाग, गोतम गंभीर, शिखर धवन, महेला जयवर्धने, डेविड वॉर्नर अशा तगड्या खेळाडुंचा भरणा त्यानंतर जहीर खान, अॅजेलो मॅथ्युज, युवराज सिंग यांनी देखिल संघाचे प्रतिनिधित्व केले पण दर्जेदार खेळाडुंचा भरणा असताना देखिल संघाला विजेतेपद मिळवता आले नाही.
DC1
मागील काही सत्रांत दिल्लीने देशांतर्गत स्पर्धांत शानदार कामगिरी केलेल्या श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, रिषभ पंत यांसारख्या युवा खेळाडुंना संघात सामावुन घेतले. या युवा खेळाडुंनी आपल्या कामगिरीत सातत्य राखले होते आणि कामगिरीने त्यांनी आपला ठसा उमटवला होता. २०१८ च्या सत्रात दिल्लीने गौतम गंभीरची कर्णधारपदी नेमणुक केली होती पण निराशजनक कामगिरीमुळे स्पर्धेच्या मध्यात श्रेयस अय्यरची कर्णधारपदी नेमणुक करण्यात आली. पण १४ सामन्यांत ५ विजयासहं संघाला ८ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
DC2
२०१९ च्या सत्रासाठी संघाने ट्रांसफर विंडो द्वारे शिखर धवनला संघात सामावुन घेतल्याने फलंदाजी आणखी मजबुत झाली आहे. दिल्लीच्या फलंदाजीची जिम्मेदारी शिखर धवन, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, कॉलिन मुनरो, कॉलिन इंग्रामवर असेल तर गोलंदाजीची जिम्मेदारी ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा, अक्षर पटेल, संदिप लामिछाने, कागिसो रबाडा व अमित मिश्रावर असेल. विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यास उत्सुक असलेल्या रिषभ पंतच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. युवा कर्णधार श्रेयस अय्यर व अनुभवी प्रशिक्षक रिकी पॉंटिगची जोडी दिल्ली साठी आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रदर्शन करु शकतील का हे पाहावे लागेल.

संभावित संघ – श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, कॉलिन मुनरो/ कॉलिन इंग्राम/ शेरफेन रुदरफोर्ड, अमित मिश्रा/ हनुमा विहारी, अक्षर पटेल, संदिप लामिछाने, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा

प्रशिक्षक – रिकी पॉंटिंग

शंतनु कुलकर्णी, क्रिकेट लेखक
Page – fb/Cricket Articles instagram/cricketarticles twitter/cricketarticles
www.thedailykatta.com

Leave a Comment