न्यूझीलंड महिलांची हेडस्कार्फफॉर हार्मनी मोहीम

hijab
न्यूझीलंड मध्ये गेल्या आठवड्यात ख्राइस्ट चर्च येथे दोन मशिदींवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने ५० जणांचा जीव घेतल्यानंतर न्यूझीलंड मधील महिलांनी हॅशटॅग हेडस्कार्फफॉर हार्मनी नावाने नवी मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत देशातील महिला डोक्याला हिजाब बांधून रस्त्यावर उतरल्या आहेत आणि त्यात शालेय मुलीही सामील आहेत. इतकेच नव्हे तर मशीद हल्ला झाल्यावर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डरन घटनास्थळाला भेट देताना आणि हल्ल्याचा उपद्रव पोहोचलेल्या नागरिकांच्या भेटीला जाताना हिजाब घालून गेल्या होत्या.

यामागे हल्लेखोराने ज्या मुस्लीम समुदायाला टार्गेट केले आहे त्या समुदायातील महिलांना समर्थन देणे हा उद्देश आहे. ओकलंड येथील डॉक्टर थाया यांनी त्यासाठी हेडस्कार्फ फॉर हार्मनी मोहीम सुरु केली आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिजाब घातलेल्या मुली महिला त्यांचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत आहेत. थाया यांच्या मते घडलेल्या प्रकाराने मुस्लीम महिला घराबाहेर पडताना हल्लेखोर हल्ला करतील या भीतीने धास्तावल्या आहेत. त्यांची ही भीती गेली पाहिजे. तुम्ही घराइतक्याच रस्त्यातही सुरक्षित आहात हा विश्वास द्यायचा आहे.. तुम्हाला आमचे समर्थन आहे असा संदेश आम्हाला या मोहिमेतून त्यांना द्यायचा आहे.

Leave a Comment