टॉयलेट सीट देईल हृदयविकाराची माहिती

tiolet
आपल्याला हृदय विकार आहे अशी एखाद्याला शंका येत असेल तर खात्री करून घेण्यासाठी रुग्णालयात जाऊन काही तपासण्या कराव्या लागतात. मात्र आता हृदयविकाराची शंका आली तर तुम्हाला उपचारांची गरज्र आहे का नाही याची माहिती घरबसल्या मिळू शकणार आहे. त्यासाठी तुम्हाला टॉयलेट सीटवर बसावे लागणार आहे.

अमेरिकेतील रोचेस्टर इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी मधील एका संशोधक टीमने यासाठी खास टॉयलेट सीट तयार केली आहे. त्यात इसीजी, बीसीजी व पीपीजी मशीन्स बसविली गेली आहेत. या टॉयलेट सीटवर बसले कि हृद्य धडकण्याचा वेग, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण यांची माहिती घेतली जाते आणि सर्व आकडेवारीचे विश्लेषण करून त्याचा अहवाल देताना मशीन तुम्हाला उपचार घेण्याची गरज आहे का नाही याचा रिपोर्ट देते.

हे मशीन उपयुक्त असले तरी सर्वसामान्य जनतेपर्यत नेणे हे मोठे आव्हान असून त्यासाठी संशोधकांची टीम विविध कंपन्यांशी संपर्क करत आहे. या कंपन्यांनी या प्रोजेक्ट मध्ये गुंतवणूक करावी असे प्रयत्न केले जात आहेत. सध्या अश्या १५० टॉयलेट सीट काही रुग्णालयात बसविल्या गेल्या असून त्यासाठी २ लाख डॉलर्स म्हणजे १३ कोटी रुपये खर्च आला आहे. अर्थात रुग्णालय प्रशासनच्या मते या टॉयलेट सीट रुग्णाची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे मॉनिटर करत असून टॉयलेट सीट साठी कराव्या लागलेल्या गुंतवणुकीच्या दुप्पट फायदा वर्षात होऊ शकेल.

Leave a Comment