कॅमेरे आणि ५ जी सपोर्टसह हुवाई बाजारात आणणार टीव्ही

huawai
कॅमेरे आणि ५ जी सपोर्टसह असलेले स्मार्टफोन बाजारात मोठ्या प्रमाणावर येऊ लागले असतानाच शाओमीसह अन्य लोकप्रिय कंपन्यांशी स्पर्धा करण्याच्या उद्देशाने स्मार्टफोन उत्पादक चीनी कंपनी हुवाई टीव्ही क्षेत्रात पाउल टाकत असून एप्रिल मध्ये कंपनी दोन खास टीव्ही बाजारात आणत असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

विशेष म्हणजे हे टीवी ड्युअलसेट कॅमेरा आणि ५ जी ला सपोर्ट करतीलच पण सोशल मिडिया आणि गेमिंग फिचर सह असतील असे कंपनीच्या रिपोर्ट मध्ये म्हटले गेले आहे. या संदर्भातली अधिकृत घोषणा लवकरच केली जात आहे. रिपोर्ट नुसार कंपनीने १ वर्षात १ कोटी टीव्ही विक्रीचे उदिष्ट ठेवले आहे. नवीन प्रोडक्ट लाईन पुढच्या महिन्यापासून सुरु केली जात असून त्यात ५५ इंची व ६५ इंची टीव्ही तयार केले जातील. त्यातील ६५ इंची टीव्ही ५ जी सपोर्टसह असतील. कंपनी होम टीव्ही तयार करणार आहेच पण त्यापुढे जाऊन व्यावसायिक टीव्ही क्षेत्रातही विस्तार करणार आहे असे सांगितले जात आहे. वन प्लसनेही टीव्ही क्षेत्रात उतरत असल्याचे संकेत दिले असून त्यांचा पहिला टीव्ही २०२० मध्ये बाजारात येणार आहे.

Leave a Comment