चीनमध्ये दाखल झाले ‘चौकीदार’ रोबोट

robot
पेइचिंग – सध्याचे युग हे डिजिटल असून प्रत्येक क्षेत्रात कर्मचाऱ्यांची जागा रोबोटने घेतली आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. त्यातच सौदी अरेबियाने धातूचे तुकडे आणि अनेक तारांपासून बनलेल्या अत्याधुनिक यंत्रमानव सोफियाला आपल्या देशाचे नागरिकत्व बहाल केल्याने हा रोबोट भरपूर दिवस नेटकऱ्यांच्या चर्चेत होता. त्यानंतर यंत्रमानव आणि मानव यांच्यामध्ये अनेक तुलनात्मक संशोधने करण्यात आली होती. अशातच एका रोबोटला चीनमध्ये एका रेजिडेंशल कम्युनिटीने चक्क चौकीदारी करण्याची जबाबदारी दिली आहे.

पेइचिंगमध्ये रात्रीच्या वेळी कोणतीही व्यक्ती नाही तर चक्क एका रोबोटचा वापर गस्त घालण्यासाठी करण्यात येणार आहे. फेशिअय रेकॉग्निशन, मॅन-मशीन कम्युनिकेशनमार्फत सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याचे काम हा रोबोट करणार आहे. ‘मेइबाओ’ असे या रोबोटचे नाव ठेवण्यात आले आहे. अवैध कामांची माहिती हा रोबोट पेइचिंगच्या मेइयुआन कम्युनिटीपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहे.
robot1
याबाबत माहिती देताना पेइचिंग एयरोस्पेस ऑटोमॅटिक कंट्रोल इंस्टिट्यूटचे प्रोजेक्ट डायरेक्टर लिउ गांगजुन यांनी सांगितले की, डिसेंबर 2018 पासून एप्रिल 2019 पर्यंत हा रोबोट तपासणीसाठी तैनात करण्यात आला आहे. चायना अॅकॅडमी ऑफ लॉन्च वीकल टेक्नॉलॉजीने पेइचिंग एयरोस्पेसकडून तयार करण्यात आलेला हा रोबोट तयार करण्यासाठी मदत केली आहे. देशातील सर्व आवासी क्षेत्रांमध्ये कोणत्याही माणसाऐवजी आता रोबोट पेट्रोलिंग करणार आहे.

Leave a Comment