लाटसाहिबला जोडे खाण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न व्यर्थ

latsah
गेली अनेक वर्षे सुरु असलेली एक विचित्र परंपरा बंद करण्यासाठी प्रशासन आणि पोलीस विभागाने केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ ठरल्याची घटना उत्तरप्रदेशातील शहाजहांपूर येथे घडली. येथे दरवषी होळीला लाटसाहिब यांची मिरवणूक काढली जाते आणि नंतर त्यांना जोडे मारले जातात. झाडू फिरविले जातात. यंदा प्रशासन आणि पोलिसांनी हा प्रकार रोखावा म्हणून कडक बंदोबस्त ठेवला होता, पोलिसांची जादा कुमक मागविली होती आणि जोडे मारण्यास बंदी घातली होती. मात्र या कशालाही न जुमानता स्थानिक जनतेने परंपरेचे पालन करून लाट साहिबना जोड्यांनी बडवून काढले.

या परंपरेमागे अशी कथा आहे की ब्रिटीश शासन काळात जुलमी शासनाला विरोध म्हणून लाट साहेब याची प्रतीकात्मक मिरवणूक काढण्याची प्रथा सुरु झाली. त्यानुसार फुलमती मंदिरापासून एका व्यक्तीला लाटसाहेबाचे प्रतिक म्हणून बैलगाडीत बसविले जाते आणि त्याला जोड्यांचा प्रसाद दिला जातो. त्या अगोदर त्याला नमस्कार करून हि मिरवणूक चौक कोतवाली येथे येते. तेथे कोतवाल लाटसाहेबाला बक्षीस देतो आणि त्याच्यापुढे नतमस्तक होतो.

यंदाही एका व्यक्तीला लाट साहेब बनवून बैलगाडीवर बसविले गेले. त्याच्या डोक्यावर मार लागू नये म्हणून हेल्मेट घातले गेले आणि लोकांनी त्याला जोड्यांनी बडविले. त्यावेळी लाट साहेब कि जय अश्या घोषणा दिल्या गेल्या. ही मिरवणूक शहरात फिरून घंटा घराला फेरा घालून पुन्हा चौक कोतवाली येथे आली.

पोलिसांनी यंदा या मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी चार द्रोन कॅमेरे, २०० सीसीटीव्ही लावले होते. मिरवणूक शांततेत पार पडली मात्र पोलीस लाटसाहेबाचा जोड्याचा मार टाळू शकले नाहीत.

Leave a Comment