यंदा या सनग्लासेस ट्रेंड मध्ये

gogglas
बॉलीवूड स्टाईल वधू वधूवेशात नखशिकांत नटलेली आणि डोळ्याला काळा चष्मा हे नित्याचे दृश्य नुकतेच उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश यांच्या वरातीमध्ये दिसले. येथे फक्त वधू ऐवजी सासू नीता काळा चष्मा घालून नृत्य करताना दिसल्या. सांगायचे कारण म्हणजे यंदाच्या उन्हाळात स्टायलिश अक्सेसरी म्हणून चष्मे खरेदी करणार असला तर नवा ट्रेंड लक्षात घेऊन करा.

सनग्लासेस कडक उन्हापासून डोळ्याचे संरक्षण करतातच पण स्टाईल स्टेटमेंट म्हणूनही उपयोगी पडतात. यांचा संबंध डोळ्यांशी असल्याने त्यांच्या गुणवत्तेत तडजोड उपयोगाची नाही मात्र फ्रेममध्ये अनेक प्रकार आपण निवडू शकतो.

sungla
तुमचे गाल जरा जास्तीच वर आलेले असतील तर ओवरसाईज फ्रेमची निवड योग्य ठरेल. बॉक्स फ्रेमचा पर्यायही निवडता येईल. ओवर साईज फ्रेममुळे वर आलेले गाल कव्हर होतील आणि चेहऱ्याला अॅट्रॅक्टीव लुक मिळेल. रुंद चेहरा असेल तर त्यानाही या फ्रेम खुलतात कारण चेहऱ्याचा बराचसा भाग त्या कव्हर करतात.

weferar
ज्यांचा चेहरा गोल आहे त्यांनी वेफरर फ्रेमचा नक्की विचार करावा. गोल चेहरा असलेल्या व्यक्तींचे कपाळ रुंद वाटते. या फ्रेममुळे चेहर्याचा लुक बदलतो, ज्यांचा चेहरा छोटा आहे, त्यांनी स्मॉल वेफररचा विचार करावा. ब्राईट पेअर्स वापरल्यास व्यक्ती अधिक स्मार्ट दिसते.

retro
चेहरा निमुळता असेल तर अॅव्हीएटर शेप परफेक्ट ठरतो. यामुळे चेहरा भरीव दिसतो. यात लहान मोठी अशी कोणतीही फ्रेम चेहऱ्याला उठाव देते.

heart-shape
जॉ लाईन अधिक उठावदार दिसण्यासाठी कॅट आय शेप फ्रेम अवश्य विचारात घ्या. यामुळे तुम्ही अधिक गॉरजीअस दिसाल. हार्टशेप चेहरा असेल तर राउंड आणि वाइड बॉटम फ्रेम एकदम मस्त दिसतात. हार्टशेप चेहरा असलेल्या महिलांचे कपाळ रुंद दिसते त्यामुळे अश्या फ्रेम निवडाव्या.

Leave a Comment