सौदीने पाठविले चुकीचे पार्थिव, कुटुंबियांना मनस्ताप

body
हृद्यविकाराचा झटका आल्याने मृत झालेल्या एका २८ वर्षीय युवकाचे पार्थिव विमानाने रवाना करताना सौदीने या युवकाऐवजी एका महिलेचे पार्थिव पाठविल्याने या युवकाच्या कुटुंबियांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. रफिक या तरुणाचा गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारीला सौदीत मृत्यू झाला त्याचे पार्थिव भारतात २१ मार्च रोजी पाठविले गेले.

रफिक याचे गाव तिरुवनंतपुरमपासून ९० किमीवर आहे. कोन्नी या गावी जेव्हा रफिकचे पार्थिव पेटीतून आणले गेले तेव्हा पेटी उघडताच त्यात महिलेचे पार्थिव असल्याचे दिसून आले. ताबडतोब याची कल्पना पोलिसांना दिली गेली. पोलिसांनी असा प्रकार घडल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. हे पार्थिव श्रीलंकन महिलेचे असावे असा प्राथमिक अंदाज असून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी हे पार्थिव कोडायाम मेडिकल कॉलेज रुग्णालयात रवाना केले असून तेथून ते पुन्हा सौदीला रवाना करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.