जाणून घ्या आयपीएलमधील या खेळाडूंची कमाई

IPL
अद्यापपर्यंत इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) एकूण 11 हंगाम खेळले गेले आहेत. क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू या स्पर्धेला जगातील सर्वात यशस्वी स्पर्धा मानतात. मागील दशकात आयपीएलने केवळ अनेक खेळाडूंचे करियरच नव्हे तर कमाईचे मुख्य स्त्रोतही बनले आहे. मागील 11 हंगामांमध्ये कोणत्या खेळाडूंनी आतापर्यंत सर्वाधिक कमाई केली आहे त्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
IPL1
आयपीएलच्या 11 हंगामांमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. चेन्नईव्यतिरिक्त, पुणे सुपर जाएंटससाठी खेळणाऱ्या माहीने आतापर्यंत आयपीएलमधून 107.8 कोटी रुपये गोळा केले आहेत.
IPL2
आयपीएलमधील कमाईच्या बाबतीत कोहली आणि गंभीर यांच्यापुढे रोहित शर्मा आहे. रोहितने आतापर्यंत 106.1 दशलक्ष कमावले आहेत. मुंबई इंडियन्सला तीनवेळा चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा डेक्कन चार्जरसाठी देखील खेळला आहे.
IPL3
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार गौतम गंभीर 94.6 कोटी रुपयांची कमाई करत तिसऱ्यास्थानी आहे. तो कर्णधारपदी असताना केकेआर दोनदा चॅम्पियन बनला होता.
IPL4
क्रिकेट जगतातील रेकॉर्डचा बेताज बादशाह विराट कोहलीने 92.2 कोटी रुपयांसह चौथ्या स्थानावर आहे. विराट आतापर्यंतच्या सर्व हंगामात फक्त आरबीसीसाठी खेळला आहे.
IPL5
आयपीएल युवराज सिंहसाठी निश्चितच खास नाही, पण युवी पैसे छापण्यात मागे पडत नाही. किंग्ज इलेव्हन पंजाब, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि पुणे वॉरियर्ससाठी खेळलेल्या युवराजने 83.6 कोटी रुपये कमावले आहेत.
IPL6
चेन्नई सुपरकिंग्जच्या या उत्कृष्ट खेळाडूने आयपीएलमधून 77.7 कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या हंगामात सुरेश रैना गुजरात लायन्सचा कर्णधार होता.
IPL7
आरसीबी सुपरस्टार एबी डिव्हिलियर्सही कमाईच्या मागे नाही. पहिल्या हंगामात दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी खेळणाऱ्या या खेळाडूने आतापर्यंत एकूण 69.5 कोटी रुपये कमावले आहेत.
IPL8
आयपीएलच्या 11 हंगामात दोन शतक झळकात विक्रम बनवणाऱ्या या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने आतापर्यंत एकूण 69.1 कोटी रुपये कमावले आहेत. शेन वॉटसन यापूर्वी आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स संघांसाठी देखील खेळला आहे.
IPL9
आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूमध्ये रॉबिन उथप्पा देखील मागे नाही. केकेआरच्या विकेट-किपर फलंदाजाने आतापर्यंत 65.8 कोटी रुपये कमावले आहेत. रॉबिन उथप्पा पुणे वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठीही खेळला आहे.
IPL10
सनरायझर्स हैदराबादच्या सलामीवीर शिखर धवनने आयपीएलच्या सर्व हंगामात भाग घेतला आणि एकूण 59.7 कोटी रुपये कमावले. आयपीएलमध्ये धवन दिल्ली आणि मुंबईसाठी देखील खेळला आहे.

Leave a Comment