न्यूझीलंडमध्ये सेमी ऑटोमॅटिक रायफलींच्या विक्रीवर बंदी

new-zeland
वेलिग्टंन – न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथील मशिदीवर झालेल्या गोळीबारात ४९ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शस्त्रांवर बंदी घालण्याची मागणी या देशात होत होती. त्यानुसार, सेमी ऑटोमॅटिक रायफलींच्या विक्रीवर बंदीची घोषणा पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी केली आहे.

याबाबत अर्डन यांनी म्हटले की, सर्व सेमी ऑटोमॅटिक रायफल, उच्च क्षमतेच्या मॅगझिन्स आणि त्यांच्या पार्ट्सवर आम्ही प्रतिबंध घालत आहोत. ज्यामुळे कोणतेही हत्यार अधिक जास्त घातक बनवले जाऊ नये. या घटनेच्या हल्लेखोराचा जन्म जन्म ऑस्ट्रेलियात झाला असून आपल्या फेसबूक पोस्टच्या माध्यमातून त्याने गुरुवारी रात्री या हल्ल्याची माहिती दिली होती. त्याने ३७ पानांच्या एका जाहिरनाम्याद्वारे आपल्या कटाची माहिती प्रसिद्ध केली होती. त्याने ‘द ग्रेट रिप्लेसमेंट’ असे नाव या जाहिरनाम्याला दिले होते.

शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी स्पष्ट केले होते की, न्यूझीलंडच्या कैदेत असलेली ती व्यक्ती ऑस्ट्रेलियाची नागरिक आहे. मॉरिसन यांनी म्हटले की, ती व्यक्ती उजव्या कट्टरवादी विचारसरणीची दहशतवादी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया सरकारने याप्रकरणी चौकशीसाठी न्यूझिलंडला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Comment