जाणून घ्या आयपीएलमधील चिअरलीडर्सची कमाई

cheer
23 मार्चपासून आयपीएलच्या 12 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर सर्व संघ आणि त्यांच्या खेळाडूंबद्दल चर्चेने बाजार गरम झाला आहे. त्याच वेळी दरवर्षी, आयपीएल सुपरहिट करणाऱ्या चीअरलीडरने देखील आपली तयारी पुर्ण केली आहे. याच दरम्यान आम्ही तुम्हाला प्रेक्षकांच्या मनोरंजनासह सामन्यात त्यांच्या संघाचे मनोबल वाढवण्यासाठी चिअरलीडर्स किती पैसे कमावतात ते सांगणार आहोत. चिअरलीडरची कमाई काय आहे? चिअरलीडरला एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात? कोणत्या संघाने त्यांना सर्वात जास्त पैसे दिले आणि कोणत्या संघाने कमी पैसे दिले आहेत? या सर्व गोष्टींचा आम्ही आज खुलासा करणार आहोत.
cheer1
माध्यमांच्या अहवालांनुसार, प्रत्येक सामन्यासाठी चिअरलीडर्सला प्रत्येक सामन्याला 6000/- दिले जातात. त्याचबरोबर सामना जिंकल्यानंतर चिअरलीडर्संना रु. 3000/ – रुपयांसह बोनस देखील दिला जातो. याशिवाय फ्रेंचाइजीकडून आयोजित केलेल्या पार्ट्यांचे त्यांना वेगळे पैसे मिळतात. पार्ट्यांमध्ये परफॉर्म करण्यासाठी त्यांना 5000/- ते 12000/- रुपये मिळतात. त्याचबरोबर फोटोशूटसाठी चिअरलीडरला 5000/- रुपये देखील स्वतंत्रपणे ऑफर केले जातात. अहवालानुसार कोलकाता नाईट रायडर्सच्या चिअरलीडरला सर्वाधिक रक्कम मिळते. केकेआरने गेल्या वर्षी चिअरलीडरच्या मानधनात 10% ते 20% टक्क्यांची वाढ केली होती. केकेआर चिअरलीडर्सला प्रत्येक सामन्यासाठी सर्वात जास्त 12 हजार रुपये देतो. केकेआरनंतर, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चिअरलीडर्सला 10000/- प्रति सामना दिले जातात.
cheer2
सामन्याच्या मानधना व्यतिरिक्त सर्व संघ 3,000 रुपये बोनस देतात. मुंबई इंडियन्सच्या चिअरलीडर्सला 7000 /- ते 8000 /- प्रत्येक सामन्यासाठी मानधन देतो. त्याचबरोबर त्यांचे मानधन देखील सामन्याच्या मानधनावर ठरविली जाते. हे आकडे आयपीएलच्या 10 हंगामाच्या आधारे घेतले गेले आहेत. प्रत्येक हंगामात 10 ते 20 टक्के वाढ झाली आहे. अर्थातच, प्रत्येक सामन्यात ही रक्कम वाढतच चालली आहे.

Leave a Comment