दहशतवाद्यांना वेळीच आवर घाला नाहीतर अवघड होऊन बसेल – अमेरिका

donald-trump
वॉशिंग्टन: अमेरिकेने पाकिस्तानला सज्जड दम देत म्हटले आहे की दहशतवाद्यांच्या म्होरक्यांच्या विरोधात निर्णायक कठोर कारवाई करा आणि जर भारतावर यावेळी पुन्हा हल्ला झाला तर इस्लामाबादसाठी कठिण होऊन बसेल. एका वरिष्ठ प्रशासकिय अधिकाऱ्याने व्हाईट हाऊसमध्ये प्रसार माध्यमांना सांगितले की, पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांच्या विरोधात कठोर आणि निर्णायक कारवाई केली पाहिजे, जेणेकरुन पुन्हा तनाव निर्माण झाला नाही पाहिजे.

नाव सांगण्याच्या अटीवर त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर पाकिस्तानच्या वतीने या संघटनांच्या विरोधात कोणतेही ठोस आणि गंभीर प्रयत्न केले नाही तर अन्य कोणत्याही हल्ल्यामुळे पाकिस्तानसाठी मोठी समस्या उद्भवू शकते आणि या क्षेत्रात तनाव वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतील. भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एरियल स्ट्राईक बद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदाय पाहू इच्छित आहे की दहशतवादी संघटनांविरोधात ठोस आणि निर्णायक केली जावी.

त्याचबरोबर पाकिस्तानने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेणे खूप घाई होईल. त्यांनी म्हटले की अलीकडेच पाकिस्तानने काही प्रारंभिक पावले उचलली आहेत. उदाहरणार्थ, काही दहशतवादी संघटनांची मालमत्ता जप्त केली गेली आहे आणि काही जणांना अटक केली गेली आहे. जैशचे काही अड्डे प्रशासनाद्वारे ताब्यात घेण्यात आले आहेत. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पाकिस्तानने यासोबतच बरेच काही केले पाहिजे.

Leave a Comment