अमेरिकेतील संघीय न्यायाधीश म्हणून भारतीय वंशाच्या नाओमी राव यांनी घेतली शपथ

naomi-rao
वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या अमेरिकेतील प्रसिद्ध वकील नाओमी जहांगीर राव (45) यांनी ‘डिस्ट्रिक ऑफ कोलंबिया सर्किट कोर्ट ऑफ अपील्स’च्या अमेरिका सर्किट न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. विवादात अडकलेल्या ब्रेट कवनोगची जागा त्यांनी घेतली आहे.

शपथविधी दरम्यान त्यांचे पती अलान लेफेकोविट्ज देखील उपस्थित होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश क्लेरन्स थॉमस यांनी राव यांना व्हाइट हाउसच्या रूजवेल्ट रूममध्ये मंगळवारी शपथ दिली. त्यांनी बायबलची शपथ घेतली. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शपथविधीच्या कार्यक्रमात सामील झाले.

भारतीय वंशाचे पारशी डॉक्टर जेरीन राव आणि जहांगीर नरिओशांग राव यांच्या घरी जन्मलेल्या नाओमी राव या श्रीनिवासन यांच्या नंतर दुसऱ्या भारतीय आहेत, ज्या एका शक्तिशाली न्यायालयाचा भाग बनल्या आहेत. असे मानले जाते की या न्यायालयापेक्षा अधिक सामर्थ्यवान केवळ अमेरिकन सर्वोच्च न्यायालय आहे.

Leave a Comment