ही मंदिरेच पण येथे होते व्यक्तीपूजा

shakuni
भारत हा देवळाराऊळांचा देश आहे. आपल्या देशात प्रत्येक गावात किमान एक देऊळ असतेच. सर्वसाधारण मंदिरे किंवा देवळे ईश्वराची पूजा अर्चा करण्यासाठी बांधली जातात. मात्र भारतात अनेक देवळे अशी आहेत जेथे भगवानाची पूजा होत नाही कारण ही देवळे महाभारत, रामायण या महाग्रंथातील व्यक्तीची आहेत. त्यातील काही मंदिरांचा परिचय या लेखात करून घेऊ.

महाभारतातील शकुनी माहिती नसेल असा हिंदू माणूस सापडणे अवघड. दुर्योधनाचा हा मामा. तो दुष्ट होता आणि भाच्याला राज्य मिळावे म्हणून त्याने पांडवांना कपटाने द्यूत खेळायला लावले आणि त्यांचे राज्य हरण केले. तेव्हापासून एखाद्या धूर्त कपटी माणसाला तो शकुनी मामा आहे असे म्हटले जाते. या शकुनीचे मंदिर केरळात कोलम जिल्यात असून याला मायम्कोडू मलंचारुवू मंदिर म्हटले जाते. पवितत्रेस्वरम असे त्याचे दुसरे नाव आहे.

iravan
पांडव बंधू अर्जुन महान धनुर्धारी होता. त्याला उलूपी या नागकन्येपासून इरावन नावाचा मुलगा झाला होता. त्याचे मंदिर तामिळनाडू मध्ये कुवागम गावात असून येथे प्रामुख्याने किन्नर भक्त येतात. किन्नर इरावनला त्यांचा देव मानतात. येथे हजारो किन्नर इरावनच्या दर्शनासाठी येतात.

sahadev
पाच पांडवामधील सर्वात धाकटा बंधू सहदेव. त्याला महादेवाचा दूत मानले जाते. या सहदेवाचे मंदिर हिमाचल प्रदेशातील सोलन गावात आहे. हे मंदिर गुहेत असून ही गुहा चमत्कारी असल्याचे मानले जाते. कारण अनेकदा येथून ढोल ताशे वाजल्याचे आवाज येतात. याला पांडव गुहा असेही म्हटले जाते.

barbarik
भीम याला हिडींबा राक्षसी पासून झालेला घटोत्कच याचा मुलगा बर्बरिक याचे मंदिर राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात असून हे मंदिर खाटू श्याम मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.

karn
उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी या गावी दानवीर कर्ण याचे मंदिर आहे. हा पांडवांचा सर्वात मोठा भाऊ पण महाभारत युद्धात तो दुर्योधनाच्या बाजूने लढला. कर्ण अतिशय उदार आणि दानशूर होता. उत्तरकाशी मधील त्याचे मंदिर लाकडात बांधले गेले आहे. मेरठ येथेही कर्णाचे एक मंदिर आहे.

Leave a Comment