वास्को द गामाचे समुद्रदिशा सूचक यंत्र मिळाले

compass
पोर्तुगालचा जगप्रसिद्ध खलाशी वास्को द गामा याने भारत शोधाच्या वेळी वापरलेले समुद्र दिशा सूचक यंत्र (होकायंत्र) मिळाले असून वैज्ञानिक हे जगातील सर्वात जुनी अॅट्रोलॅब असल्याचे सांगत आहेत. आत्तापर्यत जेवढी म्हणून जुनी होकायंत्रे सापडली आहेत त्यातील हे सर्वात जुने असल्याचा दावा केला जात आहे. पोर्तुगालच्या प्राचीन आर्माडा जहाजाच्या मलब्यात खोदकाम करताना हे यंत्र सापडले असे सांगितले जात आहे. १४९८ सालच्या या जहाजात त्यावेळची एक घंटाही सापडली आहे.

या समुद्रदिशा सूचक यंत्राची तपासणी लेझर इमेजिंग तंत्राने केली गेली असुन त्यात हे यंत्र १४९६ ते १५०१ या काळातील असावे असा निष्कर्ष काढला गेला आहे. प्राचीन काळात स्पेन आणि पोर्तुगीज खलाशी अशी यंत्रे वापरत असत. आर्माडाच्या मलब्यात सापडलेले हे यंत्र १७५ मिमी व्यासाचे असून त्याचे वजन ३४४ ग्रॅम आहे. यावर पोर्तुगालचे राष्ट्रीय चिन्ह कोरले गेले आहे.

Leave a Comment