लसीकरण विरोध करणाऱ्या नेत्याला झाल्या कांजिण्या

fedriga
इटली सरकारने बालक लसीकरण मोहीम अनिवार्य केल्याच्या निर्णयाला विरोध करणारे दक्षिणपंथी लीग पार्टीचे नेते मॅसिमिलानो फेड्रीगा यांना कांजिण्या आल्या असून ते गेले चार दिवस रुग्णालयात उपचार घेत असल्याचे फेड्रीगा यांनीच त्यांच्या ट्विटर अकौंटवर जाहीर केले आहे. सरकारच्या लसीकरण सक्तीला विरोध केल्यावर फेड्रीगा यांच्यावर सोशल मिडिया मधून जोरदार टीका करण्यात आली होती. त्यावर फेड्रीगा यांनी आपण बालकांना लस देण्याच्या विरोधात नाही पण सरकारने त्याची सक्ती करू नये असा खुलासा केला होता. इटली सरकारने जे पालक बालकांचे लसीकरण करणार नाहीत त्यांना मुलांना शाळेत पाठविता येणार नाही तसेच दंड भरावा लागेल असा नियम केला आहे.

फेड्रीगा यांनी त्यांना कांजिण्या झाल्याचे जाहीर केल्यावर एका डॉक्टर ने फेड्रीगा लवकर बरे होवोत अशी इच्छा व्यक्त केली आहे आणि एक चांगले कि फेड्रीगा यांच्या मुलांना लस दिली गेली आहे अशी कॉमेंट केली आहे. हे डॉक्टर म्हणतात लस न घेतलेले फेड्रीगा यांच्यासारखे अनेकजण आहेत. मात्र लहानपणी मुलांचे साथीच्या आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी लसीकरण होणे गरजेचे आहे. इटली सरकारने लसीकरण अनिवार्य करण्यासाठी २०१७ साली कायदा बदल केला आहे.

Leave a Comment