या शहराला आहे ११ नंबरचे वेड

solonorth2
एखाद्या माणसाला एखाद्या वस्तूची आवड किंवा क्रेझ असू शकते पण एखाद्या गावाला आणि गावातील लोकांना एखाद्या नंबरची क्रेझ असणे विरळा म्हणावे लागेल. पर्यटकांचा स्वर्ग मानल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंड मधील सोलोनॉर्थ या प्राचीन शहराला ११ या नंबरचे वेड आहे आणि हे वेड ५०० वर्षापासून चालत आले आहे. या शहरातील लोकांचे आयुष्य ११ पासून सुरु होते आणि ११ नंबरवर संपते असे म्हटले तरी अतिशयोक्ती होऊ नये. येथे कोणतेही चांगले काम करायला ११ चा मुहूर्त गाठला जातो.

solonorth
दोन हजार वर्षापूर्वी रोमन लोकांनी हे शहर वसविले असे सांगतात. त्यावेळीही या गावात ११ मोठी, ११ छोटी चर्च बांधली गेली. आत्ताही या शहरात ११ संग्रहालये असून त्यातील एकात ११ कारंजी आहेत आणि प्रत्येक कारंजात ११ तोट्या आहेत. येथे इमारती बांधताना ११ चे भान सदैव ठेवले जाते. एंटर नावाच्या सगळ्यात जुन्या म्हणजे १३ व्या शतकातील इमारतीत अॅस्ट्रोनॉमीकल टॉवरमध्ये असलेल्या घड्याळात सोन्याचे स्टार आणि राजे याच्या प्रतिमा आहेत.

विशेष म्हणजे येथील एका भिंतीवरील घड्याळात १२ हा आकडा नाही. आणि तो का नाही याची कुणालाही माहिती नाही.

cathdrel
कॅथड्रेल ऑफ सेंट उर्सस हा वास्तू रचनेचा अद्भुत नमुना आहे. या संपूर्ण चर्चचे कनेक्शन ११ नंबरशी आहे. इटलीचा आर्कीटेकट गीदियोन पोसोनी याने हे चर्च बांधले असून त्यात अनेक चिन्हे वापरली गेली आहेत. चर्च मध्ये जिन्यांच्या ११ रांगा असून प्रत्येक जिन्याला ११ पायऱ्या आहेत. इमारत तीन हिस्स्यात असून प्रत्येक मजल्याची उंची ११ मीटर आहे. ११ प्रकारच्या टाईल्स वापरल्या गेल्या आहेत. चर्च प्रार्थना हॉल मध्ये खुर्च्यांच्या ११ रांगा आणि प्रत्येक रांगेत ११ खुर्च्या आहेत.

असे सांगतात कि ११ या नंबरचा संबंध बायबलशी आहे. त्यामुळे हा नंबर शुभ मानला जातो. १२५२ साली या शहराची निवडणूक झाली तेव्हा ११ सदस्य निवडले गेले होते. या शहरात मुलांचा ११ वा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. शहरात ११ आय चॉकलेट बार नावाचे दुकान आणि इलेव्हन बिअर नावाचा बिअर कारखाना आहे. ११ हा नंबर ज्योतिष शास्त्रानुसार शुभ असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment