फॅशनचा नवा फंडा- डोळ्यासाठी सोन्याचे कॉन्टॅक्ट लेन्सेस

gold-plated-
फॅशनची एक अलग दुनिया आहे आणि समथिंग डिफ्रंट, समथिंग न्यू ही या दुनियेची परिभाषा आहे. त्यात बाजारात हजारोनी असलेले अनेक फॅशन ब्रांड फॅशनच्या नावाखाली सामान्य वस्तूंसाठी अव्वाच्या सव्वा किमती फॅशन फ्रिक ग्राहकांकासून वसूल करून घेत असतात. मग ते कपडे असोत, पादत्राणे असोत कि आणखी काही. भारतीय आणि सोने यांचे सोने या धातुशी असलेले अतूट नाते लक्षात घेऊन मुंबईतील डॉ. चंद्रशेखर छावन या ऑप्टोमेट्रीस्टने आणखी एक पाउल पुढे टाकत फॅशन जगताच्या परिभाषेत नेव्हर सीन बिफोर अशी नवी भर घातली आहे.

चंद्रशेखर यांनी डोळ्यांचे सौदर्य वाढविण्यासाठी गोल्डप्लेटेड कॉन्टॅक्ट लेन्सेस तयार केल्या आहेत आणि फॅशन प्रेमीमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. चंद्रशेखर सांगतात, भारतीय लोकांना सोन्याचे प्रचंड आकर्षण आहे. कोणतेही शुभकाम करताना सोने आवर्जून वापरले जाते. रोजच्या आयुष्यातही सोन्याचा एखादा दागिना घालण्याकडे भारतीयांचा कल असतो. जेथे म्हणून सोने अंगावर घालता येईल तेथे त्याचे दागिने वापरले जातात. त्यातून सोन्याचे दात बसविण्याची प्रथाही निर्माण झाली आहे. डोळे हा असा अवयव आहे कि आत्तापर्यंत तेथे सोन्याचा वापर करता आला नव्हता. म्हणजे सोन्याचे चष्मे वापरले जातात किंवा पापण्या टोचून तेथे बारीक रिंग घातल्या जातात. पण डोळ्यात अजून तरी सोने वापरले गेले नव्हते त्यामुळे त्यांनी सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्सेस तयार केल्या आहेत.

यात सोने अगदी कमी प्रमाणात आहे. कॉन्टॅक्ट लेन्सेस भोवती सोन्याचे वलय दिले गेले आहे आणि हे सोने चमकतेही. या लेन्सचे पेटंट चंद्रशेखर यांनी घेतले असून या लेन्सची किंमत ८ लाख रुपये आहे. चंद्रशेखर सांगतात सोन्याऐवजी चांदी आणि हिरे यांचा वापर कॉन्टॅक्ट लेन्सेसमध्ये करता येईल आणि ग्राहकाच्या मागणीनुसार तसे लेन्सेस बनवून दिले जाऊ शकतात.

Leave a Comment