गुजराथ मध्ये प्रथमच तृतीयपंथीय कॅटेगरीमध्ये मतदान करणार किन्नर

trans
आगामी लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच ७६९ किन्नर तृतीयपंथी या कॅटेगरीखाली मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. गुजराथेत या श्रेणीत आत्तापर्यंत १०५४ किन्नरांनी नोंदणी केली आहे. राज्यात एकूण मतदार संख्या ४.४७ कोटी असून त्यात २.३३ कोटी पुरुष तर २.१४ कोटी महिला मतदार आहेत, आजपर्यंत किन्नर लोकांना पुरुष अथवा महिला या श्रेणीत नोंद करून मतदान करता येत असे मात्र निवडणूक आयोगाने आता थर्ड जेंडर असा विकल्प उपलब्ध करून दिला आहे.

२०११च्या जनगणनेनुसार गुजराथ मध्ये ११५४४ किन्नर आहेत त्यापैकी १०५४ किन्नरांनी नोंदणी केली आहे. अहमदाबादेत सर्वाधिक १३९ किन्नर, आणंद मध्ये १२२, बडोदा ११९ आणि सुरत मध्ये १११ किन्नर त्याच्यासाठी विशेष निर्माण केलेल्या कॅटेगरीत मतदान करणार आहेत. २०१२ साली निवडणूक आयोगाने हा विकल्प दिला आहे. किन्नर जमातीने प्रथमच त्यांच्या खरया ओळखीने मतदान हक्क बजावायला मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Comment