कोणत्याही हवामानात चालणारी रोबो बस सुरु

gacha
तंत्रज्ञान विकासाचा मोठा फायदा ऑटो उद्योगाला मिळत असून या क्षेत्रात त्यामुळे नवी क्रांती होऊ घातली आहे. फिनलंड मध्ये एक नवी ऑटोनॉमस बस (विना चालक) पेश केली गेली असून तिच्या प्रत्यक्ष वाहतूक चाचण्या ३ शहरात सुरु झाल्या आहेत. बाजारात सध्याही विनाचालक रोबो इलेक्ट्रिक बस आहेत मात्र त्या चांगले रस्ते आणि चांगले हवामान असेल तरच वाहतूक करू शकतात. नवी बस कोणत्याही हवामानात वाहतूक करू शकणार आहे.

gacha1
गेल्या आठवड्यात गाचा नावाची ही बस फिनलंड ऑटोनॉमस ड्रायविंग कंपनी सेन्सिबल ४ ने सादर केली. तिचे डिझाईन जपानी कंपनी मुजी ने केले आहे. ही जगातील पहिली ऑल वेदर बस असल्याचा दावा केला जात आहे. मुसळधार पाउस, हिमवादळ, हिमवृष्टी, दाट धुके अश्या हवामानात सुद्धा ही बस वाहतूक करू शकेल. साधारण १५ फुट लांबीच्या या बसमध्ये १० प्रवासी बसून तर ६ प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतील.

या इलेक्ट्रिक रोबो बसला फोर व्हील ड्राईव्ह सिस्टीम दिली गेली असून तिचा सर्वाधिक वेग ताशी ४० किमी आहे. एकदा फुल चार्ज केल्यावर ती १०० किमी अंतर कापू शकेल. विक्रीसाठी ही बस २०२० मध्ये बाजारात येणार आहे.

Leave a Comment