युट्यूबने भारतात लाँच केले त्यांचे म्युझिक फिचर

youtube
गतवर्षी जूनमध्ये युट्युबने अमेरिकासह १७ देशात Youtube Music, Youtube Music Premium आणि Youtube Premium हे फिचर लाँच केले होते. ते फिचर आता भारतात देखील युट्यूबकडून लाँच करण्यात आला आहे. आता यामुळे भारतामध्ये स्ट्रिमिंग स्पेसमध्ये आणखी एक मोठ नाव जोडले गेले आहे.

कोणतेही नवीन अॅप यूट्यूब प्रीमियमसाठी डाऊनलोड करायची गरज नाही. युट्युब तुमचे फक्त अपडेट करावे लागेल. ही सुविधा त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. याचा मोफत लाभ पहिले तीन महिने घेता येणार आहे. त्यानंतर मात्र, प्रति महिना ९९ रूपये देऊन सबस्क्रिप्शन करावे लागेल. Youtube Music भारतात असलेल्या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सला चांगलीच टक्कर देईल. आपल्या होमपेज Youtube Music बद्दल गुगलनेही माहिती दिली आहे.

गाण्यांचा Youtube Musicमध्ये खजाना आहे. एकाच ठिकाणी सर्व गाणी उपबलब्ध असणार आहेत. मूळ गाण्यासोबत रीमिक्स, लाइव परफॉर्मेंसचे कव्हरेज, कव्हर सॉन्ग्स आणि म्यूजिक विडियोही असणार आहे. तुम्हाला युट्युबवर कॅटलॉग मिळेल. कंपनी त्यामध्ये दोन प्रकारची सर्व्हिस देत आहे. यामध्ये एक फ्री Youtube Music आणि दुसरे Youtube Music Premium आहे.

Leave a Comment