
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी काल अकलुजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या पाठिंब्याने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती.
रणजितसिंह मोहिते पाटलांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश
रणजितसिंह मोहिते-पाटलांनी गरवारे क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला आहे. यावेळी रणजितसिंह मोहिते पाटलांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आता भाजपवर राज्यातील मोठी घराणी विश्वास दाखवत असल्यामुळे अनेक मोठे नेते भविष्याचा वेध घेऊन भाजपमध्ये येत आहेत. नवीन लोकांना विजयासाठी संधी दिली पाहिजे. तसेच येत्या आठवडाभरता भाजपमध्ये आणखी लोक येतील, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.भाजपमध्ये रणजितसिंह गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी माढ्यात हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीला माढ्यातील लोकसभा निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.
