लिलावात चक्क एवढ्या कोटी रुपयांना न्यूटनच्या पुस्तकाची विक्री

book
गतीविषयक तीन नियमांची माहिती देणाऱ्या प्रसिद्ध वैज्ञानिक आयझॅक न्यूटन यांच्या पुस्तकाची बाऊंड कॉपी लिलावात चक्क २५.४ कोटी रुपयांना विकली गेली आहे. आजवर कुठल्याही लिलावात एवढ्या किंमती शास्त्रीय विषयावरील विकले गेले नव्हते. त्याबाबतीत हे सगळ्यात महागडे छापील पुस्तक ठरले आहे.

शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी १६८७ साली लिहिण्यात आलेल्या ‘प्रिन्सिपिआ मॅथेमॅटिका’ या पुस्तकाचे वर्णन आजवर कुठल्याही माणसाने केलेली सगळ्यात मोठी बौद्धिक प्रगती, असे केले होते. १० कोटी रुपये एवढी किंमत बकऱ्याच्या कातडीने झाकलेल्या या पुस्तकासाठी येईल, अशी ‘ख्रिस्तीज’ या ऑक्शन हाऊसला अपेक्षा होती. परंतु या पुस्तकाला अनपेक्षितपणे २५.४ कोटी एवढी किंमत मिळाली आहे.

Leave a Comment