गेमिंग लव्हर्ससाठी फेसबुकने लाँच केला गेमिंग टॅब

facebook
नवी दिल्ली – आपल्या वापरकर्त्यांसाठी सोशल मीडियातील दिग्गज कपंनी असलेली फेसबुक हे नेहमीच काही ना काही नवीन फिचर्स आणत असते. यावेळी फेसबुकने गेमिंग लव्हर्स युजर्ससाठी एक गेमिंग टॅब लाँच केला आहे. युजर्सना आता फेसबुकच्या मेन नेविगेशन पेजवर एक वेगळे सेक्शन दिसणार असल्यामुळे गेमिंग पेजवर युजर्स थेट जाऊ शकणार आहेत. अनेक इंटरेस्टिंग गेमचे ऑप्शन गेमिंग पेजवर युजर्सना देण्यात आले आहेत. युजर्सना हे गेम्स आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळता येणार आहेत.

युजर्सना गेमिंग टॅबवर गेम्सचे लोकप्रिय ग्रुप्स फॉलो करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोबर या नव्या टॅबमध्ये आपल्या आवडीने गेम्स निवडून युजर्स अनेक नवीन कॉन्टॅक्ट शोधू शकतात. रिपोर्टनुसार, युजर्सना या टॅबमध्ये टॉप स्टीमर्स आणि गेम पब्लिशर्सचे व्हिडीओ तसेच इतर गेमिंग गुप्सबाबत अपडेट दिसणार आहेत. सर्व लोकांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी एक वेगळा गेमिंग टॅब लाँच केलं आहे. जगभरात जवळरपास 700 मिलियन म्हणजेच 70 कोटी युजर्स रोज व्हिडीओ गेम खेळतात असा दावा कंपनीने केला आहे.


हे फीचर रोलआऊट करण्यास फेसबुकने सुरुवात केली असून हे लवकरच सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. तसेच या फीचरवर गेल्या वर्षीपासून काम सुरू असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. लवकरच आपल्या अ‍ॅन्ड्रॉईड युजर्ससाठी एक नवीन वेगळे गेमिंग अ‍ॅप देखील फेसबुक आणणार आहे. या नव्या गेमिंग अ‍ॅपवर सध्या कंपनी काम करत आहे. तसेच या नवीन अ‍ॅपमध्ये अनेक दमदार फीचर्स असणार आहेत. या नव्या अ‍ॅपसाठी फिडबॅकही घेण्यात येत असल्याची माहिती फेसबुकनेच आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे.

Leave a Comment