वाटणीच्या वेळी मुकेश अंबानीना सोडावे लागले होते आवडीच्या उद्योगावर पाणी

amban
सर्व जुने वाद विसरून रिलायन्सचे प्रमुख मुकेश यांनी अडचणीत सापडलेल्या धाकट्या भावाला म्हणजे अनिल अंबानी यांना मदत करून तुरुंगवारीतून वाचविले आणि दोघा भावांमध्ये नवे सौहार्दाचे पर्व सुरु झाल्याचे संकेत दिले आहेत. त्या निमित्ताने धीरूभाई अंबानी यांच्या मृत्युनंतर वाटणी होताना मुकेश अंबानी यांना त्याच्या आवडीचे उद्योग दिले गेले नव्हते या आठवणीना उजाळा मिळाला आहे.

धीरूभाई अंबानी यांचे निधन झाल्यावर दोघा भावात वाटण्या करण्यची वेळ आली तेव्हा म्हणजे २००४ साली दोघा भावांमध्ये वाद झाला आणि तो आई कोकिलाबेन याच्या मध्यस्तीने सोडविला गेला होता. २००५ साली वाटण्या झाल्या तेव्हा मुकेश यांना टेलिकॉम उद्योग हवा होता आणि आवडत होता पण तो त्यांना दिला गेला नाही. मुकेश यांनी रिलायंस इंडस्ट्रीज लिमी नावाने व्यवसाय पुढे सुरु केला आणि अनिल यांनी रिलायंस अनिल धीरूभाई अंबानी या नावाने तो सुरु केला. त्यावेळी या दोन भावांमध्ये नॉन काँपिट करार झाला होता म्हणजे दोघा भावांनी एकमेकाच्या व्यवसायात उतरायचे नाही. २००६ साली झालेला हा करार २०१० साली रद्द करण्यात आला.

त्याचवेळी मुकेश यांनी जिओ वर काम सुरु केले आणि २०१६ मध्ये जिओ कार्यरत झाली. आगमनात रिलायंस जिओने देशातील तत्कालीन तगड्या टेलिकॉम कंपन्यापुढे आव्हान उभे केले आणि देशात टेलिकॉम व्यवसायाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. कॉल टेरिफ वरून हे युद्ध डेटा युद्धावर गेले. तेव्हा अनिल यांची आर कॉम देशातील दोन नंबरची टेलिकॉम कंपनी होती पण टाटा डोकोमो आणि टेलीनॉरने आर कॉमला मागे टाकले आणि एक वेळ अशी आली कि कंपनीचे ४६ हजार कोटीचे कर्ज निवारण्यासाठी अनिल अंबानी यांना स्पेक्ट्रम, टॉवर्स विकण्याची पाळी आली. तरीही एरिक्सनचे शेवटचे कर्ज फेडणे शक्य न झाल्याने त्यांना तुरुंगात जाण्यची वेळ आली पण मुकेश यांच्या मदतीने ती टळली.

Leave a Comment