लिलावात कबुतराला मिळाली ९ कोटी ७१ लाखाची किंमत

peagon
बेल्जियम येथे पिपा या ऑक्शन हाउसने नुकत्याच केलेल्या लिलावात अर्माडो या प्रसिद्ध कबुतराला विक्रमी १.२५ मिलियन युरो म्हणजे ९ कोटी ७१ लाख रुपये किंमत मिळाली आहे. त्यामुळे अर्माडो एकदम चर्चेत आले आहे. अर्थात अर्माडो तसे पूर्वीपासूनच प्रसिद्ध असून त्याचा मोठा फॅन क्लब आहे. त्याने २०१८ साली ऐस पिजन चँपियनशिप तसेच २०१९ साली पिजन ऑलिम्पियाड व अन्गुलेम स्पर्धाही जिंकल्या आहेत. यंदा ते पाच वर्षाचे झाले असून आता ते निवृत्तीचा आनंद उपभोगत आहे. त्याचा मालक यापुढे त्याच्याकडून एकाच काम करून घेणार आहे आणि ते काम वंशविस्ताराचे आहे. म्हणजे हे कबुतर आता ब्रीडिंग साठी वापरले जाईल.

armando
चिठ्ठ्याचपाट्या पोहोचविणे, हिंदी सिनेमात प्रेमपत्रे पोहोचविणे, युद्ध काळात हेरगिरी यासाठी कबुतराचा वापर होतो हे आपण जाणतो. मात्र अनेक देशात कबुतरांच्या रेस हा लोकप्रिय खेळ आहे. बेल्जियमचे हे अर्मंडो कबुतर दीर्घ अंतर वेगाने कापणारे म्हणून प्रसिद्ध आहे. पिपा लिलाव संस्थेचे सीइओ निकोलस सांगतात, यापूर्वी रेसचे कबुतर २ कोटी ९२ लाख रुपयांना विकले गेले होते आणि तो विक्रम होता मात्र अर्मंडोने तो मोडीत काढला आहे. या कबुतराला इतकी प्रचंड किंमत मिळेल अशी कल्पना स्वप्नातही केली नव्हती. अर्मंडो ला ५ लाख युरो पर्यंत किंमत मिळावी अशी अपेक्षा होती पण केवळ एक तासात त्याला १२ लाख युरो किंमत मिळाली. या कबुतरासाठी दोन चीनी ग्राहकांनी बोली लावली होती.

Leave a Comment