आयपीएल टीम विकत घेण्यासाठी का पुढे असतात सेलिब्रिटी, उद्योजक?

IPL
येत्या २३ मार्च पासून आयपीएल नामक धमाका सुरु होत आहे. आयपीएल म्हणजे मनोरंजन आणि पैशाची दुथडी भरून वाहणारी गंगाच आणि ग्लॅमरचा तडका. खेळाडू खरेदी, टीम प्रचार, ओपनिंग क्लोझिंग सेरेमनी यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च केला जातो. सिनेसृष्टीतील सेलेब्रिटी, उद्योजक या टीम विकत घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओततात कारण त्यांनी या खेळातील हर जीतीचे फायद्याचे अचूक गणित मांडलेले असते.
ipl1
टीम विकत घेणारे मालक खेळाडूंच्या साठी कोट्यावधी खर्च करतातच शिवाय खेळाडू स्टाफ खर्चही करतात. पण त्याअगोदर या खर्चाची पुरेपूर परतफेड होईल याची काळजी घेतात. या टीम मालकांशी कंपन्या प्रायोजक म्हणून संपर्क साधतात. टीम मधील खेळाडूंनी कंपन्यांचे लोगो असलेल्या वस्तू वापराव्या यासाठी टीम मालकांना प्रचंड पैसा दिला जातो. खेळाडूच्या टोप्या पासून पायातील बूट, शर्टवर हे लोगो दिसतात. आयपीएल टीम मालकांच्या कमाईचा ३० टक्के हिस्सा यातून येतो. चित्रपटाप्रमाणे मिडिया हक्क विकले जातात त्यातून कमाई होते. ब्रॉडकास्टिंग हक्क बीसीसीआय विकते पण त्यातला मोठा भाग टीम मालकांना दिला जातो.
ipl2
अंतिम फेरी गाठणाऱ्या टीमला सर्वाधिक पैसे मिळतात. तिकीट विक्रीचू उत्पन्न असतेच. टीम मालक स्वतः सामन्याला उपस्थित राहिले तर गर्दी अधिक होते परिणामी उत्पन्न वाढते. नाही म्हणायला प्राईज मनीची रक्कम खेळाडूत वाटली जाते. पण एकंदर केलेल्या खर्चाच्या तुलनेत कमाई अधिक असते म्हणून तर शाहरुख खान पासून ते नीता अंबानी पर्यंत सर्वजण आयपीएल टीम खरेदी साठी बोली लावताना दिसतात.

Leave a Comment