चीनी लोकांचे लंच टाईममधील हे काम भारतीयांनी केले तर गमावावी लागेल नोकरी

china
कष्टाळू लोकांचा देश म्हणून चीन ओळखला जातो. तेथील लोक खुपच मेहनती असल्याचे म्हटले जाते. पण हे चीनी लोक त्यांच्या लंच टाईममध्ये जे काम करतात ते जर आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांनी केले तर आपल्याला नोकरी गमवावी लागेल. चीनी लोकांना झोप खूपच प्रिय आहे. ते कुठेही डुलकी काढतात. ते अगदी मेट्रोमध्येही झोपलेले असतात. याबाबत ग्लोबल टाइम्समध्ये लॉरेन लू या लेखिकेने लिहिले आहे, की फक्त चीनमधीलच नाहीतर आशिया खंडातील बऱ्याच जणांना दुपारची झोप प्रिय आहे.
china1
जपान आणि दक्षिण कोरिया या देशांव्यतिरिक्त भारतातील पश्चिम बंगाल आणि गुजरातमधील लोक दुपारी हमखास झोप घेतात. तर दुपारच्या झोपेसाठी पुणे प्रसिद्ध आहेच. लेखिकेचे म्हणणे आहे की दुपारी झोपणे ही संस्कृती आहे. पण आशियाई लोक युरोपमध्ये गेले तर या संस्कृतीचा स्वीकार व्हायला हवा. तज्ज्ञांच्या मते दुपारच्या झोपेमुळे शरीरात उर्जा निर्माण होते. आरोग्य चांगले राहते.
china2
जर्मन फोटोग्राफर बर्न्ड हगेमन याने स्लीपिंग चायनीज यावर एक असा प्रोजेक्ट तयार केला होता की त्याला त्यात आढळले की जिथे जागा मिळेल तिथे चिनी लोक झोपू शकतात. चीनमध्ये काम केलेली मिथिला फडके म्हणते की दुपारी ऑफिसचे लाइट मंद करून डेस्कवरच डुलकी काढली जाते. 2 तासांचा चीनमध्ये लंच टाइम असतो. डेस्कवर चिनी लोक कधीच डबा खात नाहीत. फ्रान्स आणि स्पेनमध्ये लंच टाइम जास्त वेळाचा असतो. पण अनेक देशात या वेळेत झोपायची वेळही ठरलेली असते.

Leave a Comment