परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती बिघडली

parvez-musharaff
पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि १९९९ ते २००७ या काळात देशाचे प्रमुख पद भूषविलेले परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर दुबई येथे उपचार सुरु आहेत. त्यांना एमीलोयडोसीस हा दुर्मिळ आजार झाला असल्याची माहिती पाकिस्तान मुस्लीम लीगचे महासचिव मेहरेने आदम मलिक यांनी दिली असून याच पक्षाचे ओव्हरसीज अध्यक्ष अफझल सिद्दिकी यांनी डॉन न्यूज टीव्हीला या संदर्भात माहिती दिली आहे. मुशर्रफ यांना शनिवारी रात्री अचानक त्रास होऊ लागल्यावर त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याचे रविवारी सांगण्यात आले.

२००६ पासून मुशर्रफ दुबई येथेच आहेत. त्याच्या आजाराविषयी असे सांगितले गेले आहे कि या आजारामुळे शरीरातील विविध अवयवात प्रोटीनचा साठा होऊ लागतो आणि त्यामुळे चालणे, उभे राहणे त्रासदायक बनते. मुशर्रफ यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला गेला असून त्यांना या आजारातून बरे होण्यास किमान ५ ते ६ महिने लागतील. बेनझीर भुत्तो आणि लाल मशीद इमाम याच्या हत्येचा मुशर्रफ यांच्यावर आरोप असून त्यांना पाकिस्तानने फरारी घोषित केले आहे.

Leave a Comment