ब्युटी क्वीनने ग्लॅमर ऐवजी दिले देशसेवेला प्राधान्य

garima1
जगभरात कुठे न कुठे सतत सौदर्य स्पर्धा होत असतात. प्रसिद्धी, ग्लॅमरचे हे जग. यात ब्युटी स्पर्धा जिंकणाऱ्या सुंदरी बहुतेक भविष्यात मॉडेलिंग, अॅक्टिंगचे क्षेत्र करिअर म्हणून निवडतात असे आपण पाहतो मात्र भारताच्या एका ब्युटी क्वीनने या ग्लॅमर कडे पाठ फिरवून देशसेवेला प्राधान्य देताना लष्करी अधिकारी म्हणून करिअर निवडले आहे.
garima2
ही सुंदरी आहे गरिमा यादव. ती मुळची हरियाणाची. दिल्ली विश्वविद्यापीठच्या सेंट स्टीफन कॉलेजची पदवीधर. सौंदर्य स्पर्धेत गरीमाची निवड २०१७ साली इंडियाज मिस चार्मिग फेस खिताबासाठी झाली होती. ही स्पर्धा मुंबईत पार पडली होती. मात्र त्यानंतर गरीमाने मळलेली मॉडेलिंगची वाट न निवडता तिचे स्वप्न खरे करण्यासठी प्रयत्न सुरु केले आणि पहिल्याच प्रयत्नात सीडीएस म्हणजे कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसमध्ये पास होऊन चेन्नीत ऑफिसर म्हणून प्रशिक्षण घेतले आहे. आता ती लेफ्टनंट आहे.
garima3
गरिमाला इटली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ब्युटी स्पर्धेसाठी बोलावणे आले होते मात्र तिने देशसेवेला प्राधान्य दिले. गरिमा सांगते, तुम्ही खेळाडू असला, तब्येतीने मजबूत असला तरच लष्करात जाऊ शकता असा लोकांचा एक गैरसमज आहे. माझ्या मते आपण आपल्यातील कमजोरी ओळखून त्यावर मात केली तर आयुष्यात अनेक चांगले क्षण आपल्या वाट्याला येऊ शकतात हे लक्षांत घेतले पाहिजे.

Leave a Comment