जाणून घ्या एका मिस्ड कॉलने आपल्या पीएफची माहिती

EPFO
आपल्यातील बहुतेक लोक सरकारी किंवा खाजगी कंपनीत काम करत आहेत. त्याबदल्यात त्यांना महिनाकाठी मिळणाऱ्या पगारातून एक ठराविक रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत जातो. आपल्यातील काहीजण काही अडचणींमुळे पहिली नोकरी सोडून दुसऱ्या ठिकाणी नोकरी करतात. पण पीएफ अकाऊंट एकच ठेवतात. असे करणाऱ्यांना आपल्या पीएफ खात्याची खुप चिंता असते. पण आता चिंता करण्याचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला एक असा नंबर सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यावर नजर ठेवता येणार आहे.

आपल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील जमा रक्कमेचा तपशील जाणून घेण्यासाठी अनेक पर्याय आहेत. पण यामध्ये ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर सांगितलेला मिस्ड कॉलचा पर्याय सर्वात सोपा आहे. तुम्ही फक्त एक मिस्ड कॉल करुन तुमच्या खात्यातील जमा रक्कमेची माहिती मिळवू शकता. तुम्हाला यासाठी तुमच्या पीएफ खात्याशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवरुन 011-22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल. यानंतर तुम्हाला एक मॅसेज येणार ज्यामध्ये अकाउंटमध्ये उपलब्ध असलेल्या पीएफसंबंधी माहिती मिळणार.

याशिवाय मॅसेजच्या माध्यमातूनही तुम्ही पीएफ बॅलेन्स जाणून घेऊ शकता. मात्र या दोन्ही सुविधांचा वापर करण्यासाठी तुमचे युएएन (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) अॅक्टिव्ह असणे गरजेचे आहे. जर तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून पीएफ बॅलेन्स माहिती करू इच्छिता तर EPFOHO UAN टाईप करुन 7738299899 वर पाठवा. या सेवेचा लाभ तुम्ही हिन्दी, इंग्रजी, पंजाबी समवेत १० भाषांमध्ये घेऊ शकता. उदाहरणार्थ जर तुम्हाला हिन्दीमध्ये बॅलेन्स जाणून घ्यायचा आहे तर EPFOHO UAN HIN टाईप करुन 7738299899 वर पाठवा. पंजाबीसाठी – PUN, गुजरातीसाठी – GUJ, मराठीसाठी – MAR, कन्नडसाठी – KAN, तेलुगूसाठी – TEL, तमिळसाठी – TAM, मल्याळमसाठी- MAL, बंगालीसाठी- BEN टाईप करा.

Leave a Comment