राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडणार डीएमके

DMK
चेन्नई : मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा तामिळनाडूच्या राजकारणातील प्रमुख विरोधी पक्ष डीएमकेने प्रसिद्ध केला आहे. पण डीएमकेच्या जाहीरनाम्यामुळे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. एकीकडे जाहीरनाम्याद्वारे मतदारांना आपल्याकडे आकर्षिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न डीएमकेने केला आहे.

तर दुसरीकडे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचे धक्कादायक आश्वासन देखील दिले आहे. याव्यतिरिक्त नोटाबंदीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.

यापूर्वीही अनेकदा राज्य सरकार आणि राज्यपालांकडे या प्रकरणातील आरोपींची सुटका करण्याची मागणी डीएमकेने जाहीररित्या केली आहे. पण, आता राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचे थेट आश्वासन पक्षाच्या जाहीरनाम्यातच दिल्याने दक्षिणेकडील राजकारणात वादविवाद सुरू झाले आहेत.

Leave a Comment