‘चौकीदार’ मोदींना ‘बेरोजगार’ हार्दिक पटेलचे प्रत्युत्तर

hardik-patel
मुंबई – नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक पटेल यांनी ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या ‘मैं भी चौकीदार’ अभियानाला सडेतोड उत्तर दिले आहे. मोदींना काँग्रेस ‘चौकीदार चोर है’ बोलत असल्यामुळे, आपल्या नावापुढे मोदी यांनी चौकीदार लावून प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर भाजपमधील सर्व नेत्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार असे लिहिले आहे. हार्दिक पटेल यांनी त्यावर निशाणा साधत आपल्या नावापुढे बेरोजगार हार्दिक पटेल, असे लिहिले असल्यामुळे सोशल मीडियात याच्याच चर्चा रंगल्या आहेत.
hardik-patel1
नागरिकांमध्ये भाजपचे ‘मैं भी चौकीदार’ अभियान मोठ्या प्रमाणात चर्चा घडवून आणत आहे. काँग्रेसच्या आरोपांना लगाम लावण्यासाठी भाजप नवनवीन शक्कल लढवत आहे. आता याला काँग्रेसच्या नेत्यांकडूनही प्रतिउत्तर मिळण्याची शक्यता आहे. ट्विटरवर हार्दिक पटेल यांनी बेरोजगार हार्दिक पटेल, असे लिहिले आहे. ट्विटवर त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातून कदाचित हा काँग्रेसच्या निवडणूक अभियानाचाही मुद्दा बनू शकतो.

आपल्या ट्विटरवर नावापुढे केंद्रीय मंत्री पूनम महाजन, अमित मालवीय, केंद्रीय मंत्री चौधरी, मीनाक्षी लेखी ,विजेंद्र गुप्ता, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर रमण सिंह, उत्तराखंडचे मुख्यमंत्री दत्रिवेंद्र सिंह, अनुराग ठाकूर, अशा भाजप नेत्यांनी चौकीदार लिहिले असल्यामुळे सोशल मीडियावर त्यांना अनेक प्रकारे ट्रोल व्हावे लागत आहे. पण मोदीच्या या मोहिमेत भाजप समर्थकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

Leave a Comment