अॅपलचा नवीन आयपॅड एअर आणि आयपॅड मिनी लाँच

apple
मोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपलने आपले नवीन आयपॅड एअर आणि आयपॅड मिनी लाँच केले आहेत. नव्या आयपॅड एअरमध्ये १०.५ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तर आयपॅड मिनीमध्ये ७.९ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. अॅपलचे लेटेस्ट A12 बायोनिक प्रोसेसर दोन्ही आयपॅडमध्ये देण्यात आले आहे आणि दोन्हीमध्ये अॅपल पेन्सिल सपोर्ट देण्यात आला आहे.

आयपॅड एअरमध्ये १०.५ इंचीचा डिस्प्ले, २२२४*१६६८ पिक्सेल रिजॉल्यूशन, ६४ जीबी आणि २५६ जीबी या दोन व्हेरिएंटमध्ये आयपॅड उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर एअर गोल्ड, सिल्वर आणि स्पेस ग्रे कलर्सचे ऑप्शन देखील मिळणार आहेत. त्याचबरोबर आयपॅडमध्ये टच आयडी होम बटन, हेडफोन जॅक आणि लाईटनिंग चार्जिंग पोर्ट,अॅपल पेन्सिलचा सपोर्ट मिळणार आहे. हा आयपॅडचे वजन ४५६ ग्राम आणि ६.१ mm इतका पातळ आहे. आयपॅड एअरच्या वाय-फाय मॉडलची सुरुवातीची किंमत ४४,९९० रुपये एवढी आहे. तर वाय-फाय सेलुलर मॉडलची किंमत ५५,९०० रुपये त्याचबरोबर स्मार्ट की-बोर्डची किंमत १३,९०० रुपये एवढी आहे. हा आयपॅड ३० भाषांना सपोर्ट करतो.

तर आयपॅड मिनीमध्ये ७.९ इंचाचा डिस्प्ले, A12 बायोनिक चिपसेट, अॅपल पेन्सिलचा सपोर्ट ६४ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट, सिल्वर, स्पेस ग्रे, गोल्ड या तीन कलर्समध्ये उपलब्ध असणार आहे. अॅपल पेन्सिलची किंमत ८,५०० रुपये (पेन्सिल वेगळी विकत घ्यावी लागणार) एवढी आहे. आयपॅड मिनी वाय-फाय मॉडलची सुरुवाती किंमत ३४,९०० रुपये तर वाय-फाय-सेलुलर मॉडलची किंमत ४५,९०० रुपये एवढी आहे.

Leave a Comment