भूक कमी करायचीय? मग दोरीवरच्या उड्या मारा

skipping

न्यूयॉर्क दि.१५ – शरीराच्या उभ्या अवस्थेत केले जाणारे एरोबिक्सचे व्यायाम प्रकार व त्यातही दोरीवरच्या उड्या भूक कमी करण्यास उपयुक्त ठरतात असे संशोधकांना आढळले आहे. संशोधकांनी विविध वयोगटातील व्यक्तींवर केलेल्या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली आहे. दोरीवरच्या उड्या मारल्याने अतिस्निग्ध पदार्थ खाण्याची इच्छाही लक्षणीयरित्या कमी होते असेही या संशोधकांना आढळले आहे.

तळपायांची सतत आग होते का? जाणून घ्या कारणे आणि उपाय

संशोधकांच्या मते दोरीवरच्या उड्या मारताना शरीराची आणि पोटाची हालचाल उभ्या अवस्थेत होते. त्यामुळे पोटाला धक्के बसतात आणि भूक लागण्यासाठी आवश्यक असणार्‍या ग्रेलिन या हार्मोन्सचे प्रमाण कमी होते असे दिसून आले. अन्य कोणत्याही व्यायामापेक्षा दोरीवरच्या उड्यांमुळेच हे हार्मोन कमी स्त्रवते व त्यामुळे उड्या मारणार्‍याला कमी भूक लागते. यामुळे वजन आपोआप उतरण्यासाही मदत होते.

संशोधकांनी काही जणांना तीस मिनिटे दोरीवरच्या उड्या, स्थिर सायकल चालविणे किवा काही दिवस अगदी आराम करणे  असे विविध पर्याय दिले होते त्यामध्ये दोरीवरच्या उड्या मारण्याचा व्यायाम करणार्यां ची भूक लक्षणीयरित्या कमी झाल्याचे त्यांना आढळले.

आकाश अंबानीच्या लग्नात शाहरुखची बेईज्जती, व्हिडीओ व्हायरल

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही