ह्या आहेत काही प्रचलित फॅशन टर्म्स आणि त्यांचे अर्थ


फॅशन जगतातले असे अनेक शब्द आहेत जे आपल्याला वाचून माहिती तर असतात, पण त्यांचे अर्थ आपल्याला तितकेसे परिचयाचे नसतात. त्यामुळे फॅशन जगतामध्ये वारंवार वापरले जाणारे शब्द आणि त्यांचे अर्थ जाणून घेऊ या.

ऑट कुटुअर – ( haute couture ) हा शब्द फ्रेंच भाषेतील आहे. एखादा पोशाख बनविणे, यासाठी हा शब्द वापरला जातो. खास डिझायनर क्रिएशन्स करिता आहा शब्द आता प्रचलित आहे. हे पोशाख पूर्णपणे ‘ हँड मेड ‘असतात. त्यामुळे हे पोशाख नेहमी मर्यादित संख्येमध्ये ( लिमिटेड एडिशन ) उपलब्ध असतात, व सर्वसाधारण पोषाखांच्या किंमतींपेक्षा या पोषाखांच्या किंमती कैकपटीने जास्त असते. तसेच हे पोशाख खास ग्राहकाच्या गरजेनुसार तयार केलेले असतात.

लेबल – फॅशन लेबल म्हणजे डिझायनर ने त्याच्या ब्रँडच्या नावाने तयार केलेले पोशाख. हे पोशाख अतिशय मर्यादित संख्येने बनविले जात असून, ते अतिशय स्टायलिश आणि महाग असतात.

ऑन्सॉम्बल – ( ensemble ) हा शब्द देखील फ्रेंच भाषेतून आला असून ह्याचा अर्थ पोषाखाच्या जोडीने संपूर्ण अॅक्सेसरीज, म्हणजेच आभूषणे, हँड बॅग, शूज इत्यादी.

सिलुवेत – ( silhoutte ) म्हणजे एखाद्या पोशाखाचा मूळ आकार, किंवा त्याची आऊटलाईन. ‘ ए लाईन’, ‘स्ट्रेट’. ‘फ्लेअर्ड ‘, इत्यादी सिलुएतचे प्रकार आहेत.

ईन व्होग – एखादा पोशाख किंवा अॅक्सेसरी जेव्हा ‘ ईन व्होग ‘ असते, तेव्हा तो पोशाख किंवा अॅक्सेसरी खूप लोकप्रिय असते.

मोनोक्रोम – ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन चे पोशाख मोनोक्रोम कॉम्बिनेशनचा म्हणून ओळखला जातो.

Leave a Comment