हा टेलिफोन बूथ पाहण्यासाठी येतात शेकडो पर्यटक

booth
ब्रिटन मध्ये सध्या एक जुना पुराना टेलिफोन पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. अवघ्या ३६ फुट चौरस जागेतील हा फोन जगातील सर्वात छोटे संग्रहालय म्हणून प्रसिद्ध झाला असून ब्रिटीश टेलिकम्युनिकेशन चा हा टेलिफोन बूथ वॉरले कम्युनिटी असोसिअशन नावाच्या संस्थेने जतन केला आहे. या बूथ मध्ये जुन्या वस्तूंचे संग्रहालय बनविले गेले आहे. दर तीन महिन्यांनी या वस्तू बदलल्या जातात.

माणसाला आपसात संपर्कासाठी टेलिफोनची सुविधा ग्राहम बेल या संशोधकामुळे उपलब्ध झाली आणि संवादाचे परिमाण बदलले. एका नव्या क्रांतीची झाली. सुरवातीला घरोघरी फोन नव्हते. अगदी महत्वाचा निरोप दुसऱ्या गावी द्यायचा असला तर ट्रंक बुकिंग करावे लागे. अनेकदा त्यासठी टेलिफोन बूथवर जावे लागत असे. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने ही गरज राहिली नाही त्यामुळे टेलिफोन बूथ बंद केले गेले आहेत. तरीही जुन्या आठवणीना उजाळा मिळावा यासाठी हे बूथ संग्रहालय खूपच उपयुक्त ठरले आहे.

ब्रिटीश टेलिकम्युनिकेशनने या प्रकारचे त्यांचे ४३ बूथ हटविले तेव्हा वॉरले कम्युनिटी असोसिअशनने ते वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी २००८ पासून या संस्थेने विविध प्रकारे पैसे जमवून जुन्या वस्तू जतन करण्यासाठी ही मोहीम चालविली आहे. त्यातूनच इंग्लंडच्या यॉर्कशायर पश्चिम भागातील जुना बूथ संग्रहालयाचे स्वरूप देऊन जतन केला गेला आहे. या चिमुकल्या संग्रहालयात अनेक ऐतिहासिक वस्तू ठेवल्या गेल्या असून संग्रहालयाला द मेपोल असे नाव दिले गेले आहे. अनेक लोक हे संग्रहालय पाहण्यासठी गर्दी करतात असे समजते.

Leave a Comment